Aurangabad Introduction on woman on social media CEO of Coca Cola Lakha Ganda sakal
छत्रपती संभाजीनगर

सोशल मिडीयावर ओळख...अन् घातला लाखाला गंडा

कोका-कोला कंपनीचा सीईओ असल्याची बतावणी करून महिलेसोबत सोशल मीडियावर केली मैत्री

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोका-कोला कंपनीचा सीईओ असल्याची बतावणी करून महिलेसोबत सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर लंडन येथून भारतात येणार असल्याची थाप मारून विमानतळावर दीड लाख ब्रिटिश पौंड अडकल्याचे सांगत महिलेला सोशल मीडियावरील भामट्याने सुमारे एक लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ या काळात घडला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून केल्वीन विल्यम्स (रा.लंडन) आणि निता दास (रा. दिल्ली) या भामट्यांविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिनोबिया मोहम्मद फारूख पटेल (३७, रा. मोहम्मद मस्जिद जवळ, लेन-१, बेरी बाग, हर्सुल) यांच्याशी सोशल मिडीयावर केल्वीन विल्यम्स नावाच्या प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. तेव्हा त्याने स्वतःला कोका-कोला कंपनीचा सीईओ असल्याचे सांगून युनाईटेड किंगडम (लंडन) येथील लायसेस्टर शहराचा रहिवाशी आहे असे सांगितले. तसेच त्याला जेनिफर नावाची मुलगी सुध्दा आहे अशी थाप मारली. त्यानंतर दोघांमध्ये अनेकवेळा संदेश देवाणघेवाण होत राहिली. त्यामुळे पुढे परिचय आणखी वाढत गेला. पुढे त्याने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतात येणार असल्याचे सांगून तिकिटाचा फोटो जिनेबिया यांच्या व्हॉट्सऍपवर पाठवला. त्यानंतर केल्विन विल्यम्स व नीता दास या दोघांनी जिनोबिया यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी दिल्ली विमानतळावर दीड लाख ब्रिटिश पौंड सोबत आणले होते.

मात्र ते पकडले गेले आहेत. त्यामुळे ते सोडवून घेण्यासाठी टॅक्स क्लियर करावा लागेल. त्यासाठी निता दास हिच्या बँक खात्यावर ५५ हजार रुपये पाठवण्यास जिनोबिया यांना सांगितले. जिनोबिया यांचा विश्वास अगोदरच विल्यम्सने संपादन केलेला असल्याने जिनोबिया यांनी त्याला आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले. मात्र, १ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा विल्यम्स आणि नीता दास यांनी जिनोबिया यांना फोन केला. त्यावेळी टॅक्स क्लियरेनसाठी मदत केल्याने खोट्या मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची जिनोबिया यांना धमकी दिली. घाबरून जिनोबिया यांनी दास हिच्या बँक खात्यावर पुन्हा ४२ हजार ८०० रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर त्या दोन्ही भामट्यांचा संपर्क होत नसल्याने जिनोबिया यांनी हर्सूल पोलीसात धाव घेत ९७ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT