Aurangabad Khultabad  
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : खुलताबादमध्ये दुचाकी गाडीने अचानक घेतला पेट

जवळच काही रिक्षा असल्याने धावपळ

सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद : खुलताबाद बाहेरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभ्या असलेल्या बॅटरीवर चालणारया दुचाकीने अचानक पेट घेतला,सदरील घटना बुधवारी (ता.24) दुपारी 12 च्या दरम्यान घडली,सुदैवाने जिवित हानी झाली नाही,तसेच या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्शांना अग्नीच्या झळा पोहचल्या माञ ताबडतोब त्या हलविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या बाबत अधिक माहिती अशी खुलताबाद-म्हैसमाळ रोडवरील लालमाती परिसरात राहणारे मनोज मच्छिंद्र बारगळ याने चार महिन्यापुर्वीच बॅटरीवर चालणारी दुचाकी घेतली होती,नेहमी प्रमाणे ते या गाडीवर बसुन खुलताबाद शहराबाहेरील आंबेडकर चौकात आले,या ठिकाणी गाडी उभी करुन ते चहा पिण्यासाठी गेले,तोच उभ्या गाडीने पेट घेतला,या ठिकाणी नेहमीच रिक्शांची वर्दळ असते,या रिक्शा तातडीने हलविण्यासाठी एकच धांदल उडाली,सदरील दुचाकी जळुन खाक झाली.

सदरील घटनास्थळी बिट जमादार सिध्दार्थ सदावर्ते यांनी भेट देत पंचनामा केला,पुढील तपास जमादार शेख जाकेर हे करीत आहेत. बॅटरीवर चालणारया गाड्यांचे स्फोट होण्याचे प्रकार वाढले असुन,नुकत्याच वेरुळ लेणी परिसरात पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारया गाड्या सुरु करण्यात आल्या असुन,या घटना पाहता,या गाड्याहीॆ पर्यटकांसाठी धोकादायक ठरु शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT