Aurangabad Kotla Colony water theft from tank captured on camera sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : टाकीवरून पाणी चोरणारा टॅंकर कोणाचा?

कोटला कॉलनीतील प्रकार स्मार्ट सिटीसाठी लावलेल्या कॅमेऱ्यात कैद

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पाण्याच्या टाक्यांवर सुरक्षारक्षक नेमले आहेत. टॅंकरद्वारे पाणी चोरी झाली तर कारवाई करण्याचा इशारा प्रशासकांनी दिला आहे. पण त्याला न जुमानता कोटला कॉलनी येथील टाकीवर खासगी टॅंकर भरले जात असल्याचे स्मार्ट सिटीने बसविलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे हे टँकर नेमके कोणाचे आहेत? याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाणीबाणी निर्माण झाली. पाण्यासाठी नागरिक आंदोलने करत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टॅंकरद्वारे होणारी पाणी चोरी थांबवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून टँकर भरणाऱ्या पॉइंटवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्हीचे फुटेज स्मार्ट सिटी कार्यालयातील कंमाड अँड कंट्रोल रुममध्ये दिसते. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख हेमंत कोल्हे यांच्याकडे देखील हे चित्रीकरण पाहण्याची सुविधा आहे. कोटला कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर १४ टँकर भरले जातात. या टँकरची यादी स्मार्ट सिटीकडे देण्यात आली आहे. त्यांचे नंबर व जीपीएस लोकेशनची नोंद घेणे सुरु आहे. असे असताना खासगी टँकरने येथून पाणीचोरी होत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

चौकशी सुरू

हे टॅंकर कोणाचे आहेत? किती टॅंकर भरले गेले? या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे. काही टॅंकर ठरलेल्या ठिकाणी जात नसल्याचे देखील समोर आले आहे, असे स्मार्ट सिटीचे तांत्रिक विभागाचे प्रमुख फैज अली यांनी सांगितले.

बारकोड बसवण्यात येणार

महापालिकेने ९० टँकरची सोय केली आहे. या व्यतिरिक्त पाण्याच्या टाकीवर येणाऱ्या टॅंकरवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले. प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा लावली जात आहे. महिन्याभरापासून हे काम सुरु आहे. पण अद्यापही ३० टँकरला जीपीएस लावण्याचे काम बाकी आहे. आता प्रत्येक टँकरवर बारकोड देखील लावण्यात येणार आहे. या बारकोडला स्कॅन केल्यानंतर हे टँकर कुठे गेले होते, त्याने किती फेऱ्या मारल्या ही माहिती समोर येणार असल्याचे फैज अली यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT