ourt order News
ourt order News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : कुलकर्णी खून प्रकरणी प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पाथरी (जि. परभणी) येथील संकेत कुलकर्णीच्या औरंगाबादेत २३ मार्च २०१८ रोजी झालेल्या खूनाच्या प्रकरणात शुक्रवारी (ता. २४) प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांच्यापुढे घेण्यात आल्या.

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पुराव्याच्या आधारे संकेत कुलकर्णी खून खटल्यातील आरोपी संकेत जायभाय व इतर तीन आरोपींनी संगनमताने खून केला असल्याचा युक्तिवाद केला.

घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अरविंद चव्हाण, शुभम डंख, बळीराम तुपे व फिर्यादी विजय वाघ यांनी दिलेल्या साक्षी व त्यावरील त्यांची उलट तपासणी यावर युक्तिवाद करण्यात आला. सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी त्यांच्या साक्षीमध्ये यातील आरोपी संकेत जायभाय व त्याचे तीन साथीदार संकेत मचे, उमर पटेल, विजय जौक यांनी संकेत कुलकर्णी याला कामगार चौक येथे बोलावून त्याला कारमध्ये बसण्यास सांगितले.

तो कारमध्ये बसला व परत उतरून दुचाकीवरून निघाला असता संकेत जायभायने संकेत कुलकर्णी याला ‘थांब तुला येथेच चिरडतो’ म्हणून दुचाकीला धडक दिली. यावेळी संकेत मचे, उमर पटेल, विजय जौक यांनी संकेत जायभायला ‘घाल गाडी अंगावर’ असे म्हणत प्रोत्साहित केले. सरकारी पक्षातर्फे

ॲड. उज्ज्वल निकम यांनी आज युक्तिवाद संपवला, त्यांना ॲड. अविनाश देशपांडे, ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले. पोलिसांतर्फे या प्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे, विठ्ठल चासकर, जनार्दन निकम उपस्थित होते. आरोपींतर्फे ॲड राजेश काळे, ॲड. निलेश घाणेकर, ॲड. भाले उपस्थित होते. सुनावणीदरम्यान न्यायालयात आज प्रचंड गर्दी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT