Ambadas danve as spokes person of shivsena from marathwada 
छत्रपती संभाजीनगर

मातोश्रीवरुन दानवेंना झुकते माप; शिवसेनेच्या प्रवक्तेपदी अंबादास दानवेंची निवड

शेखलाल शेख

औरंगाबाद: शिवसेनेच्या वतीने राज्यात प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव औरंगाबादचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

मातोश्रीवरुन दानवे यांना झुकते माप
जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे यांनी गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचे संघटन वाढवल्याचे पहायला मिळाले. शिस्तबद्ध नियोजन, पक्षाच्या ध्येय धोरणानूसार आंदोलनांची आखणी, दिल्लीते गल्ली अशा सगळ्या विषयांवर त्यांनी परखड भूमिका घेतली आहे. लोकसभा ते ग्रामपंचायत अशा सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये दानवे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या कामाची छाप गेल्या अनेक वर्षात पाडल्याचे पहायला मिळाले. राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आणि दानवे यांच्या कामाची थेट पक्षप्रमुखांकडूनच वेळोवेळी दखल घेतल्याचे पहायला मिळाले. 

जिल्ह्यातील खैरे विरुद्ध दानवे या वादात देखील मातोश्रीवरून गेल्या काही महिन्यात दानवे यांनाच झुकेत माप दिल्याचे देखील दिसून आले होते. जिल्हाप्रमुख म्हणून संघटना वाढीत केलेल्या चांगल्या कामाची दखल म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना विधान परिषदेत संधी दिली. आमदार झाल्यानंतर जिल्हाप्रमुख आणि विधान परिषद सदस्य अशी दुहेरी भूमिका देखील दानवे यांनी पार पाडली.

माध्यमांसमोर मांडली पक्षाची बाजू
विधान परिषदेच्या अधिवेशनात मराठवाड्यातील आरोग्य, सिंचन, कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा याशिवाय विकासकामांवर अभ्यासपुर्ण भाषणे करत दानवे यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. औरंगाबाद की संभाजीनगर मुद्दा असो की हिंदु्त्वाचा प्रसार माध्यमांसमोर दानवे यांनी शिवसेनेचे भुमिका अनेकदा भक्कमपणे मांडली आहे. त्यांच्या एकूणच कामकाज आणि वक्तृत्वाची दखल घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवल्याचे बोलले जाते.

जिल्हा बँकेच्या वादानंतर महत्वाची नियुक्ती-
नुकत्याच झालेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपची साथ घेतल्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्यातील वाद समोर आला होता. हा वाद मातोश्रीपर्यंत देखील पोहचला होता. मात्र यात देखील दानवे यांची सरशी झाल्याचे त्यांच्या नियुक्तीवरून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT