covid 19 aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना रूग्ण म्हणतात, फिरायला जाऊ द्या...तरुण रुग्ण करतायेत मागणी

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपाययोजना करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. रुग्णांच्या उपचारासह त्यांना जेवण पुरविताना आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांची दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या वेगवेगळ्या फर्माइशीमुळे अधिकारी, कर्मचारी त्रस्त आहेत.

एमआयटी कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी (ता. ११) काही तरुण रुग्णांनी आम्हांला मोकळ्या मैदानात फिरायला जाऊ द्या अशी मागणी करत सेंटरप्रमुखाला भांडवून सोडल्याचा प्रकार घडला. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या अनेक तऱ्हा समोर येत आहेत. काही जणांना घरून डबे देण्याची मुभा देण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी डब्यातून नको त्या वस्तू मागविल्या. त्यानंतर प्रत्येक डबा तपासून दिला जात होता.

त्यामुळे महापालिकेची दमछाक होत आहे. त्यात गुरुवारी सायंकाळी काही तरुण रुग्णांनी आम्हाला फिरण्याची मोकळीक का देत नाही? अशी मागणी करत अधिकाऱ्यांना भांडवून सोडले. शेवटी वरिष्ठापर्यंत हे प्रकरण गेले. त्यांची समजूत काढल्यानंतर हे तरुण शांत झाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Sports News: महाराष्ट्र केसरी विजेत्यांचा शड्डू ऑलिंपिकमध्ये घुमेना, मराठी मल्ला मागे का पडतात?

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Indian Theatre Documentary 1988 : भारतीय नाट्य परंपरेचा दस्तऐवज; जब्बार पटेल यांचा 'इंडियन थिएटर' लघुपट

SCROLL FOR NEXT