corona vaccine 
छत्रपती संभाजीनगर

Corona Vaccination: औरंगाबादमध्ये पहिल्याच दिवसी लसीकरणावर संकट!

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी एक एप्रिलपासून शहरातील ४५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पण महापालिकेकडे केवळ दोन हजार लसींचा साठा शिल्लक आहे. शहरातील ३७ केंद्रांवर ४५ पथकांमार्फत लस देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असले तरी गुरुवारी (ता. एक) लस प्राप्त होण्याची वाट या पथकांना पाहवी लागेल. लस घेण्यासाठी नागरिकांनी मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी केवळ एक पुरावा सोबत आणावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्यात आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी डॉक्टर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर व तिसऱ्या टप्यात ६० वर्षावरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र त्यांना गंभीर आजार आहे, अशांना लस देण्यात आली. आत्तापर्यंत ९५ हजारपेक्षा जास्त जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या चौथ्या टप्यात एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या १९ व खासगी १८ केंद्रावर ४५ टीमच्या माध्यमातून लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी केंद्रावर २५० रुपयांत लस दिली जाणार आहे. पण महापालिकेकडे बुधवारी (ता. ३१) लसीकरण केल्यानंतर केवळ दोन हजार लसींचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे उद्याच्या लसीकरणावर संकट ओढवले आहे.

महापालिकेची केंद्रे 
एन-११, एन- ८ महापालिका आरोग्य केंद्र, सिडको मेडिकव्हर हॉस्पिटल, चिकलठाणा इएसआयसी, घाटी, जिल्हा रुग्णालय, सादात नगर, छावणी, बन्सीलालनगर, राजनगर, शिवाजीनगर, बायजीपुरा, आरेफ कॉलनी, सिल्कमिल्क कॉलनी, शहाबाजार, कैसर कॉलनी, विजय नगर आरोग्य केंद्र, सातारा एमआयटी कॉलेज. 

खासगी केंद्रे 
धूत, एमजीएम, युनायटेड सिग्मा, डॉ. हेडगेवार, कमलनयन बजाज, एमआयटी, मेडिकोव्हर, अल्पाईन, दहिफळे, जे. जे., लायन्स आय, निमाई, लाइफ लाईन, उत्कर्ष, माणिक, सेन्यूरी, कृपामनी, इंटरनॅशनल हॉस्पिटल.

४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरणाची तयारी झाली आहे. बुधवारी शासनाकडून लसी मिळणार होत्या पण त्या आता गुरुवारी सकाळी मिळतील. त्यानंतर त्या तातडीने केंद्रावर पाठविल्या जातील. 
-डॉ. बाळकृष्ण राठोडकर, प्रभारी आरोग्य अधिकारी. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT