Aurangabad Dogs Dies  
छत्रपती संभाजीनगर

दोन दिवसांत आठ कुत्र्यांचा मृत्यू, कारण काय कळेना

माधव इतबारे

औरंगाबाद : एकीकडे कोरोना संसर्ग कमी करण्यात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असताना आता बन्सीलालनगरात दोन दिवसांत सात ते आठ कुत्र्यांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (ता. २३) दोन कुत्र्यांचा मृतदेह खडकेश्वर येथील रुग्णालयात नेऊन त्यांचे पोस्टमॉर्टम केले. त्याचा अहवाल आज बुधवारी (ता. २४) मिळणार आहे.


शहरातील बन्सीलालनगर भागात दोन-तीन दिवसांपासून भटके कुत्रे मृत अवस्थेत सापडत आहेत. पण हे कुत्रे कशामुळे मरताताहेत याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. माजी महापौर गजानन बारवाल यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळविली. त्यानंतर मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी पाठविले. त्यानंतर कुत्र्यांचे पोस्टमॉटर्म करण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख, लाइफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे सचिव जयेश शिंदे, राहुल लोधे यांनी दोन मृत कुत्रे खडकेश्वर येथील रुग्णालयात नेले व पोस्टमॉर्टम करण्यात आले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT