corona updates 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना बाधित होणाऱ्यांत पुरूषांची संख्या जास्त; लहान मुलांचेही प्रमाण वाढले

मधुकर कांबळे

औरंगाबाद: कोरोबाधितांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. महापालिकेच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या ५४ हजार ४५९ कोरोना बाधितांपैकी ३३ हजार ६५५ पुरुष आहेत, तर २० हजार ८०४ महिलांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर लहान मुलांची बाधित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने लहान मुलांमध्ये होणारा संसर्ग रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या संख्येची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असले तरी त्याचा फार परिणाम दिसत नाही. कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ११ मार्चपासून शहर व जिल्ह्यात अंशत: लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे रात्री आठ वाजेनंतर सर्व दुकाने बंद केली जात आहे. दर शनिवार व रविवारी पूर्ण लॉकडाउन पाळला जात आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात घराबाहेर फिरणाऱ्यांच्या संख्येवर अद्याप नियंत्रण आलेले नाही. रहदारी मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार शून्य ते पाच या वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ८९९ वर गेली आहे. दररोज दहा किंवा त्यापेक्षा जास्त लहान मुले कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबरच पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. पाच ते १८ वयोगटातील ५३६७ व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. १८ ते ५० या वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ३४२ एवढी झाली आहे.

कोरोनाबाधितांमध्ये तरुणांची संख्या वाढत असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. ५० आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील १५ हजार ८५१ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. हे प्रमाण तरुणांच्या संख्येच्या जवळपास निम्मे आहे. या सर्व वयोगटातील मिळून ५४ हजार ४५९ व्यक्ती आतापर्यंत कोरोनाबाधित झाल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT