one side love Aurangabad breaking news
one side love Aurangabad breaking news 
छत्रपती संभाजीनगर

असं कुठं असतंय व्हय...ओळख झाल्यानंतर म्हणाला आता लग्नच कर...! 

सुषेन जाधव

औरंगाबाद: सविता (नाव बदललेलं आहे) औरंगबादेतल्या खासगी कंपनीत काम करते. बोलका स्वभाव. दरम्यान चैतन्यसोबत (नाव बदललेलं आहे) तिची ओळख झाली. एक दिवस चैतन्यने सविताला थेट लग्नाचीच गळ घातली. केवळ ओळखीच्या आधारावर चक्क लग्नाच्या मागणीने ती गोंधळून गेली, तिने नकार देताच त्याने थेट विदर्भातील तीचे गाव गाठले.

तेथे तीच्या घरच्यांना ‘आमचे’ प्रेमसंबंध असल्याचे सांगत लग्न लावून द्या म्हणत गळ घातली. विदर्भातून सुरु झालेला हा एकतर्फी प्रेमाचा सिलसिला औरंगाबादेत आल्यानंतर दामिनी पथकाच्या पुढाकाराने थांबला, इतकेच नव्हे तर सवितावर ओढवलेले संकटही दूर झालं अन् तीने पुन्हा नव्या जोमाने नोकरीस सुरवात केली.

विदर्भातील एका गावात सुरेखा (नाव बदलेलं आहे) यांना सुनिता, सविता आणि वनिता (नावे बदलेलेली आहेत) अशा तीन मुली. तिघीही उच्चशिक्षित. त्यापैकी सुनिता आणि सविता या औरंगाबादेत खासगी कंपनीत काम करतात. तर वनिता गावीच स्पर्धा परिक्षेची तयारी करते. मोठी सुनिता ही सिडको एमआयडीसीमध्ये काम करते तर दुसरी सविता (वय अंदाजे २३) ही रांजणगाव एमआयडीसीमध्‍ये कंपनीत काम करते.

दरम्यान तीची औरंगाबादपासून २०० किलोमीटरवर गाव असलेल्या चैतन्यशी ओळख झाली. चैतन्यला सविताचा बोलका स्वभाव चांगलाच भावला, तो तिच्या प्रेमात पडला खरा, मात्र इकडे सविताला याची पुसटशीही कल्पना नव्हती. 

थेट लग्नाची घातली मागणी 
एक दिवस चैतन्यने सविताला थेट लग्नाची मागणी घातली. केवळ ओळखीच्या आधारावर लग्नाची मागणी घातल्याने सविता गोंधळली, तिने लग्नाला नकार देत त्याला समजावले. मात्र या प्रेमवीराने काहीएक न ऐकता थेट सविताचे गाव गाठले. तिथे तिचे आईवडिल, नातेवाईकांना भेटून ‘आमचे’ प्रेमसंबंध असून आमचे लग्न लावून द्या म्हणत तगादा लावत नातेवाईकांत बदनामी केली. 

त्याने सविताची लहान बहिण ‘वनिता’ हिला दररोज फोन करुन ‘तुझ्या आईवडिलांना औरंगाबादला पाठवून दे, माझ्याशी लग्न लावून द्यायला सांग’ असे म्हणत असे. इकडे सविता घाबरल्याने तीने सुनिताकडे धाव घेतली. तिच्या कानावर टाकले. त्या दोघांनी घरी बोलल्यानंतर तिची आई सुरेखा या औरंगाबादला आल्या.

दामिनीने दिला मदतीचा हात 
सविताने दामिनी पथकाच्या इंचार्ज उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांना भेटून आपबीती कथन केली. दरम्यान चैतन्य याने आईवडिलांना बोलाव असा तगादा लावल्याने चैतन्यला आई आल्याचे सांगून ज्यूस सेंटरमध्ये भेट असे सांगण्याचे करेवाड यांनी सविताला सांगितले. एम. वाळूज पोलिस ठाण्याचे ड्यूटी ऑफीसर यांनी करेवाड यांच्या मदतीला पठाण आणि आणखी एकजण दिले. करेवाड यांनी पठाण यांच्या खासगी वाहनाने सिव्हीलवर संबंधित ज्यूस सेंटर गाठले. तिथे चैतन्‍य पोहोचल्यानंतर त्याने चौफेर अंदाज घेत सविताला भेटला. त्याच वेळेस करेवाड यांनी चैतन्यला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. 

सविताने सुटकेचा निश्‍वास टाकला-
करेवाड यांनी चैतन्यला ताब्यात घेत त्याची समजूत घातली. त्याच्या आईलाही बोलावून त्याने केलेला ‘प्रताप’ सांगितला. चैतन्यविरोधात १४९ दाखल केला. करेवाड यांनी सवितासह तिच्या आईला धीर दिल्याने त्यांनाही हायसे वाटले. तब्बल काही दिवस नैराश्‍य आलेल्या सविताने २९ मार्च रोजीच्या घडलेल्या या प्रकारानंतर पुन्हा नोकरी जॉईन केली. तिच्या आईनेही करेवाड यांचे आभार मानले. 

सविताने वेळीच दामिनीकडे धाव घेतली. कधीही अशी समस्या असल्यास १०० नंबरवर दामिनीला संपर्क साधावा. सविताचा आता आत्मविश्‍वास वाढला आहे. 
- स्नेहा करेवाड, पोलिस उपनिरीक्षक तथा इंचार्ज दामिनी पथक. 

 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT