covid 19 aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus| चिंताजनक! बालकांमध्ये प्रमाण वाढले; आठ दिवसांत ७५ बालकांना बाधा

मधुकर कांबळे

औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात बाधितांमध्ये बालकांचे वाढते प्रमाण काळजीत टाकणारे आहे. गेल्या आठ दिवसांत शहरात ७४ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरात रस्त्यांवर फिरणारा तरुणवर्ग अधिक असून, एकूण बांधितांमध्ये त्यांचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत पोचले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत आहे. दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण सापडत आहेत तर दुसरीकडे उपलब्ध आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. यातच आरोग्य तज्ज्ञांनी शहरात कोरोनाचा नवीन स्टेन सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे. यात बालकांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. गेल्या १५ दिवसांत कोरोना बाधितांतून बालकांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

जिल्ह्यात झालेल्या बालकांच्या मृत्यूपैकी त्यात शहरातील दोन बालकांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात शहरात बाधित झालेल्या बालकांपैकी एकाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र, आता बालकांचाही मृत्यू होत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, महापालिकेकडून प्राप्त अहवालानुसार २७ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान शून्य ते पाच वर्षे वयोगटातील औरंगाबाद शहरात ७४ बालके कोरोनाने बाधित झाली आहेत.

बाधितांत बालकांचे हे प्रमाण वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात कमी दिसत असले तरी चिंता वाढवणारे आहे. कारण, लहान मुलांवरील उपचार पद्धती आव्हान देणारी आहे. त्यामुळे आई वडिलांनी बालकांची विशेष काळजी घेणे, हाच एकमेव चांगला उपाय असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. 

शनिवारी १८ बालकांना बाधा- 
गेल्या आठवडाभरात आढळलेल्या एकूण बाधित बालकांपैकी शनिवारी (ता. तीन ) शहरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्वाधिक १८ बालके कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहेत. तत्पूर्वी, २७ मार्चला १०, २८ ला ५, २९ ला ११, ३० ला ९, ३१ ला ७, १ एप्रिल रोजी १०, तर २ एप्रिलला ४ बालके बाधित निघाली आहेत. 

वयोगटानुसार बाधितांची संख्या 
- शून्य ते पाच वर्षे : ९६३ 
- सहा ते अठरा वर्षे : ५,८५८ 
- १९ ते ५० वर्षे : ३६,१८७ 
- ५१ वर्षांवरील : १७,७६८ 
शहरात एकूण बाधित : ६०,७७९. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

SCROLL FOR NEXT