qr code for water bill aurangabad mnc 
छत्रपती संभाजीनगर

क्यूआर कोड स्कॅन करून भरा पाणीपट्टी; महापालिकेची नागरिकांसाठी सुविधाऔर

माधव इतबारे

औरंगाबाद: महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली नगण्य आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीची जास्तीत जास्त वसुली व्हावी यासाठी नागरिकांना क्यूआर कोड स्कॅन करून रक्कम भरता येणार आहे. यासाठी काही बँकांशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरात गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना समाधानकारक पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेचा तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय आहे पण प्रत्यक्षात सहा, सात दिवसानंतर पाणी मिळते. त्यात महापालिकेची पाणीपट्टी तब्बल चार हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांकडून पाणीपट्टी भरण्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे थकीत पाणीपट्टी टप्प्याटप्प्याने वसुल करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.

वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी पाणीपट्टीच्या मागणीचे संगणकीकरण केले जात आहे. त्यासाठी महापालिका बँकांसोबत सामंजस्य करार करणार आहे. पाणीपट्टीसाठी नऊ झोनसाठी नऊ स्वतंत्र बँक खाती उघडण्यात आली आहेत. बँकेसोबत पाणीपट्टीधारकांचा डेटा संलग्न केला जाणार आहे. संबंधित बँक नळधारकास एसएमएसच्या माध्यमातून पाणीपट्टी भरण्याबाबत संदेश पाठवेल. त्याचसोबत नळधारकाला पाणीपट्टी क्युआर कोड व ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढेल असा प्रशासनाचा दावा आहे.

साठ कोटींचे उद्दिष्ट-
चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टीपोटी साठ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तसेच कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. त्यातील किमान चाळीस टक्के वसूल होतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानुसार किमान ६५ कोटी रुपये वसुल होतील असे मानले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT