1drown_ 
छत्रपती संभाजीनगर

मासे पकडण्यासाठी गेले अन् तलावात बुडून दोघा युवकांचा मृत्यू

रविवारी दुपारी करण निकम व नितीन गायकवाड हे दोघेही तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले.

सुषेन जाधव

औरंगाबाद : मासे पकडण्यासाठी (Fishing) गेलेल्या दोघा युवकांना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही तलावात बुडाले. ही दुर्दैवी घटना रविवारी (ता.नऊ) दुपारी साडेचार वाजता हर्सूल सावंगी (Harsul Sawangi Pond)येथील तलावात घडली. करण दशरथ निकम (वय ३२), नितीन विजय गायकवाड (२१, दोघेही रा. इकबालनगर, फकीरवाडी, हर्सूल) अशी मृत युवकांची नावे आहेत. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात (Harsul Police Station) नोंद करण्यात आहेत. (Aurangabad Latest News Two Youths Drowned In Harsul Sawangi Pond)

या संदर्भात हर्सूल ठाण्याच्या उपनिरीक्षक संगीता गिरी यांनी सांगितले की, रविवारी दुपारी करण निकम व नितीन गायकवाड हे दोघेही तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार तलावाजवळ उभ्या असलेल्या काही युवकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलाला आणि हर्सूल पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अतुल ठोकळ यांच्यासह अग्निशमन दलाचे ड्युटी इन्चार्ज एल. पी. कोल्हे, शिवसंभा कल्याणकर, अक्षय नागरे, पंकज भालेकर, सुभाष दुधे, भुरालाल सलामपुरे आदींनी हर्सूल-सावंगी तलाव परिसरात धाव घेत मदत कार्य केले. या घटनेची नोंद हर्सूल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT