aurangabad district bank. 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहा संचालकांना मतदारांनी नाकारले; दिग्गजांना पराभवाचा धक्का

प्रकाश बनकर

औरंगाबाद: मोठ्या चुरशीच्या झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी अनेकांना चकवा दिला. बँकेचे दिग्गज विद्यमान संचालक असलेले आमदार हरिभाऊ बागडे, रंधे, मगर, रंगनाथ काळे अशा एकूण सहा संचालाकांना मतदारांनी नाकरले. तर आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, कृष्णा पाटील डोणगावकर, देवयाणी डोणगावकर अशा १४ संचालकांची नव्याने बँकेत एँट्री झाली आहे.

बँकेचे माजी अध्यक्ष स्व. सुरेश पाटील यांच्याबरोबर बँक व्यवस्थित चालवून ती नफ्यात आणण्याचे काम बागडे यांनी केले. भाजप सरकार असताना बँकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या गंगापूर-वैजापूर तालुक्यासाठीच्‍या प्रकल्पासाठी निधी आणला होता. पंचवीस वर्षाचा अनूभव असल्याने त्यांच्या पराभवाने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. बागडे यांच्यासह संचालक रंगनाथ काळे, अशोक मगर, अकुंश रंधे, पुंडलिक जंगले, अभिजीत देशमुख या सहा विद्यमान संचालकांचा पराभव झाला. तर दामोदर नवपूते, प्रभाकर पालोदकर, नंदकुमार गांधीले, दशरथ गायकवाड,बाबुराव पवार हे बँकेचे माजी संचालक निवडणुकीपासून अलिप्त होते.

बिनविरोधासाठी दोनदा प्रयत्न 
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार बागडे यांनी सर्वपक्षीय संचालक मंडळाच्या दोन बैठका घेतल्या. मात्र यात अनेकांनी दांड्या मारल्या. कॉग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांच्या गटाला दोन जागा देण्यात येणार होत्या. मात्र, सर्व काही फिसकटले. 

बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडेल, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरै यांनी दोन दिवसापुर्वी केले होते. त्याचप्रमाणे बँकेच्या लागलेल्या निकालही चमत्कारीक लागला आहे. सहा संचालकांचा पराभव झाला असला तरी १४ नवीन संचालकांची बँकेत एंट्री झाली आहे. यात सुहास सिरसाट, अर्जून गाढे,सु रेखा काळे, मनोज राठोड, कृष्णा पाटील डोणगांवकर, अप्पासाहेब पाटील, जगन्नाथ काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, अभिषेक जैस्वाल, पार्वताबाई जाधव, डॉ. सतीश गायकवाड, देवयानी पाटील आणि दिनेश परदेशी हे सर्वजण बँकेत पहिल्यांदा निवडून आले आहेत. तर सहा संचालक जुने निवडून आले आहेत. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सर्वाधिक एकुण १४ जागा निवडून आल्या आहेत. मात्र आमदार तथा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला. यामुळे पॅनल निवडून आले असले तरी गड आला पण सिंह गेला असी परिस्थिती आमदार बागडे यांच्या पराभवामुळे झाली आहे. अभिजित देशमुख यांच्यासह अन्य काही संचालकांचा पराभव झाला. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. 
-अब्दुल सत्तार, राज्यमंत्री, तथा संचालक, जिल्हा बँक 

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिविगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Inspector Manju: गावाकडच्या काकूंची सत्यावर माया; सेटवर येऊन चक्क सोन्याची वस्तू केली गिफ्ट!

SCROLL FOR NEXT