छत्रपती संभाजीनगर

विनाकारण फिरताय! थेट होईल गुन्हा दाखल

यात ५२ ठिकाणी नाकाबंदी करत थेट गुन्हे दाखल करत ११३५ केसेस दाखल करुन ५ लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली.

सुषेन जाधव

औरंगाबाद : वाढत्या कोरोनाच्या (Corona) अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने (Bambay High Court Aurangabad Bench) स्वतःहून दखल घेत काय कार्यवाही केली? अशी विचारणा करत त्यासंदर्भात माहिती जमा सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. त्यावर प्रशासनाची गोची झाली. याच अनुषंगाने पोलिस दलानेही चांगलीच कंबर कसली असून विनामास्क, विनाकारण घराबाहेर पडलेल्यांविरोधात थेट कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. यात ५२ ठिकाणी नाकाबंदी करत थेट गुन्हे दाखल करत ११३५ केसेस दाखल करुन ५ लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती (Aurangabad Crime Branch Police) गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली.(Aurangabad Latest News Without Reason If You Walks Then Charges Will File)

अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या १०१ जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम १८८, २६९, २७० नुसार ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून सहायक वाहतूक विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार संचारबंदी असूनही आवश्यक कारणांशिवाय फिरणाऱ्यांविरोधात तब्बल ११३५ केसेस करण्यात आल्या आहेत. यातून ५ लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचेही श्री. साळोखे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कारवाईची ही मोहीम यानंतरही अशीच सुरु राहणार असल्याचेही श्री साळोखे म्हणाले. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तपासणी नाक्यावर नेमलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

SCROLL FOR NEXT