पैठण (जि.औरंगाबाद)  : संत एकनाथ महाराजांच्या वाडा मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला केशर आंब्याची केलेली आरास.
पैठण (जि.औरंगाबाद) : संत एकनाथ महाराजांच्या वाडा मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला केशर आंब्याची केलेली आरास. 
छत्रपती संभाजीनगर

विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला केशर आंब्यांची आरास

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : संत एकनाथ महाराजांच्या (Saint Eknath Maharaj) गावातील वाडा मंदिरात अक्षय तृतीयाच्या (Akshay Tritiya) मुहूर्तावर शुक्रवारी (ता.१४) नाथ महाराजांच्या पूजेतील विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला (Vijayi Pandurang) केशर आंब्यांची आरास परंपरेनुसार करण्यात आली. पुराणातील कथेनुसार, अक्षय तृतीयेच्या याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भक्त सुदामा यांची भेट झाली होती. अक्षय तृतीयापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता, चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण यांचे अवतरण झाले होते, त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतार घेऊन प्रकट झाले होते आणि कालातीत किंवा त्रिकालाबाधीत सत्य असलेल्या भगवत गीतेची अमृतवाणी प्राप्त झाली. (Aurangabad Live News Mango Decoration Before Vijaya Panduranga In Paithan)

वैशाख महिना हा खूपच उष्ण असतो. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करण्याची पध्दत आहे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षयतृतीयापासून खाण्यास रुचकर असतो. अक्षयतृतीयाला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते. या निमित्ताने नाथवंशजांच्या प्रथा, परंपरेनुसार नाथवंशजांनी नाथांच्या वाडा मंदिरात सकाळी काकड आरती व विधीपूजन करुन मूर्तीला केशर आंब्याची आरास केली. यावेळी नाथवंशज चैतन्य महाराज गोसावी, विनित गोसावी, पुष्कर गोसावी, दिवाकर गोसावी, हरीपंडित गोसावी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT