छत्रपती संभाजीनगर

Video: औरंगाबादेत कोरोना लसीकरणासाठी गर्दी, नागरिकांना केंद्र बंद करण्याची धमकी

अतुल पाटील

औरंगाबाद : शहरातील सिडको एन-आठ येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) रुग्णालयात लसीकरणासाठी (Corona Vaccination Site) ज्येष्ठ नागरिकांची गुरुवारी (ता.सहा) गर्दी केली होती. आजच्या दिवशी केवळ दीडशे नागरिकांनाच लस देण्याचे नियोजन असताना पाचशेहून अधिक लोकांनी याठिकाणी गर्दी केल्याचे दिसले. या केंद्रावर सकाळी सव्वा दहा ते दुपारी चार वाजेदरम्यान लसीकरण (Corona Vaccination) होते. (Aurangabad Live Updates Crowds At Vaccination Site, Threat For Close)

रोजच्या रोज या ठिकाणी जेवढे उपलब्ध डोस असतील, त्या प्रमाणात टोकण दिले जातात. टोकण घेण्यासाठी लोकांना सकाळी सात वाजेपासून याच रांगेत उभे राहायला सांगतात. साडेनऊ वाजल्यानंतर टोकण वाटप केले जाते.

लसीकरण सुरू होण्यापूर्वीच लोकांना तीन तास उन्हामध्ये उभे राहावे लागते. रांगेत साधारणत चारशे ते पाचशे लोक रांगेत उभे आहेत. मर्यादित डोस असल्याने त्यांना पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतरही माघारी परतावे लागते. या ठिकाणी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण होत आहे. इतका वेळ थांबून ही त्यांना उभे रहायला ना मंडप आहे, ना पिण्यासाठी पाणी आहे, याठिकाणी फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन होताना दिसत नाही. लोकांनी लसीकरण, टोकण याबाबत विचारणा केली असता, या ठिकाणचे आरोग्य अधिकारी लसीकरण केंद्रच बंद करत करेन, अशी लोकांना धमकी देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT