छत्रपती संभाजीनगर

मुलासह वडिलांचा मृत्यू, एका दिवसाचा नातू देतोय मृत्यूशी झुंज

सासरा, पती आणि मुलाच्या विरहाने पत्नीची देखील तब्येत खालविली असुन तिच्यावर उपचार सुरू आहेत.

विकास पाटील

बनोटी (जि.औरंगाबाद) : हसत्‍या खेळत्‍या परिवाराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले आणि कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलासह वडिलांचा मृत्यू, तर एका दिवसांचा जन्मलेला मुलगा मृत्यूशी झुंज देत असल्याची मन सुन्न करणारी घटना तितुर (ता.सोयगाव) येथे रविवारी (ता.१८) घडली आहे. वडील भगवान पंडीत खैरनार (वय ५६), मुलगाराहुल भगवान खैरनार (वय ३०, रा.तितुर) असे मृतांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. सोयगाव तालुक्यात कोरोनाचा संक्रमण वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. तालुक्यात रुग्णसंख्या ३०० पार गेली असुन मृत्युच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे. गोंदेगाव येथे चार जण, तर हनुमंतखेडा येथे आठ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

तितुर येथील एकाच कुटुंबातील दोन जणांचा बळी घेतला आहे. तितुर येथील भगवान पंडीत खैरनार (वय ५५) यांना कोरोनाची लागण झाल्याने पाचोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु दोन दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला. नंतर संसर्गामुळे मुलास देखील कोरोना झाल्याने प्रथम उपचारासाठी पाचोरानंतर चाळीसगाव. परंतु प्रकृती जास्त खराब असल्याने औरंगाबाद येथे घेऊन जात असताना सोमवारी (ता.१९) पहाटे राहुलचा देखील मृत्यु झाला. अवघ्या दोन दिवसांत पिता पुत्राचा कोरोनाने बळी घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यातच राहुलच्या पत्नीस रविवारी (ता.१८) प्रसुतीसाठी पाचोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असता एका गोंडस मुलास जन्म दिला. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. मुलास जन्मताच ऑक्सिजन पुरवठा आवश्यक होता. मात्र पाचोरा येथील एकाही रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने जवळील चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे एक दिवशीय मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. तर सासरा, पती आणि मुलाच्या विरहाने पत्नीची देखील तब्येत खालविली असुन तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दुसर्‍या टप्प्यात प्रभाव वाढला : तितुर येथे गेल्या वर्षी अवघे तीन जण कोरोना बाधित होते. तर दुसऱ्या लाटेने तर संपुर्ण गावावर वर्कदुष्टी पडली पडल्याने सात जणांचा मृत्यु झाला असून पन्नास जण कोरोनाशी लढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT