Aurangabad Petrol Diesel News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना संदर्भातील अटी नियम पाळाल, तरच मिळेल पेट्रोल-डिझेल

प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरात वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता त्यावर प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. यालाच हातभार लावण्यासाठी पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. कोरोना संदर्भातील नियम पाळणाऱ्यांनाच आता पेट्रोल-डिझेल देण्यात येणार आहे. या संदर्भात सर्व सदस्यांनी एकजूटीने हा निर्णय घेतला असल्याचे असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले.


अखिल अब्बास म्हणाले की, पेट्रोलियम डिलर्स असोशिएशनतर्फे पेट्रोल पंपाधारकांना दिलेल्या निर्देशानुसार मास्क नसणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. सोमवार ते शुक्रवारदरम्यान पहाटे पाच ते रात्री आठ या वेळेतच पेट्रोल, डिझेल मिळेल. यावेळे व्यतिरिक्त इतर वेळेत मिळणार नाही. तसेच शनिवार आणि रविवारी या दोन दिवसांत मात्र केवळ अत्यावश्‍यक सेवेत समावेश असणाऱ्यांनाच पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येणार आहे.

मात्र या दरम्यान ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. याशिवाय दररोज रात्री आठ वाजता संचारबंदी सुरु होत असल्याने सात वाजेपर्यंतच इंधन भरुन घ्यावे, शहर जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर गर्दी करु नये. कोरोनाविरोधात लढणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून ती प्रत्येकानेच पार पाडायची आहे, असे भावनिक आवाहनही असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT