छत्रपती संभाजीनगर

मुलाला कोरोना झाल्याचे कळताच आईचे निधन, भेटण्याची इच्छा राहिली अधूरीच

दीपक जोशी

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : एकुलत्या एक मुलाला भेटण्यासाठी शिर्डीला निघालेल्या वृद्ध आईवर काळाने झडप घातली आणि त्यात आईचा अंत झाल्याची घटना गुरूवारी (ता.१५) रात्री तुर्काबाद खराडीत (ता.गंगापूर) घडली आहे. या घटनेमुळे गाव शोकसागरात बुडाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरापासुन जगात कोरोनाचे थैमान सुरु आहे. गेल्या वर्षभरात कित्येक जणांना कोरोनाची बाधा झाली तर बरेच जण बरे होऊन घरी परतले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांना संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यु होतो असा अनेकांचा समज झाला आहे.

गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथे कुमावत कुंटुब आपला टेलरिंग काम करुन उदरनिर्वाह करतात. लहान्या मुलाच गेल्या काही वर्षांत निधन झालेल आहे. तर मोठा मुलगा शिर्डी येथे कामानिमित्त राहतो. कुमावत कुटुंब हे तब्बल दीड वर्ष घराबाहेर निघाले नाही. मात्र शिर्डी या ठिकाणी मुलगा आजारी असल्याचा निरोप आल्याने सदरील कुटुंब गुरुवारी एका खासगी वाहनाने शिर्डीच्या प्रवासाला निघाले होते.

वाहनात इंदुबाई विठ्ठल कुमावत (वय ६२) व विठ्ठल कुमावत (वय ६७) हे गाडी करुन मुलाला भेटण्यासाठी जात असतानाच रस्त्यातच आपल्या मुलाला कोरोनाची लागण झाली असून तो सध्या रूग्णालयात दाखल आहे असे इंदुबाईला सांगण्यात आले. हे कळताच त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या आणि त्यातच आईचे जागेवरच निधन झाले. त्यामुळे सदरचे वाहन माघारी तुर्काबादकडे वळविण्यात आले. मात्र मुलाला भेटण्याची इच्छा अर्ध्यावरच राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT