Nath Shashti Ustav 
छत्रपती संभाजीनगर

नाथषष्टी: तुकाराम बीजेला नाथांच्या वाड्यातील २१ फुट खोल व ९ फुट रुंद रांजण भरण्याची प्राचीन परंपरा

चंद्रकांत तारू

पैठण (जि.औरंगाबाद) : तुकाराम बीज मुहूर्तावर पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वाडा मंदिरातील कृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पाणी भरलेल्या नाथांच्या रांजणाची विधिवत पूजा व आरती विनीत महाराज गोसावी, ज्ञानराज गोसावी, श्रीजेश गोसावी यांनी केली. यानंतर भाविकांनी गोदावरीतून पाणी आणून भरण्यास सुरुवात करुन नाथषष्टी उत्सव यात्रा सोहळ्याला औपचारिक प्रारंभ करण्यात आला.


यानिमित्त सकाळी दहा वाजता नाथांच्या मंदिरात हा परंपरेनुसार हा धार्मिक कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. नाथषष्टी सोहळ्याच्या निमित्ताने तुकाराम बीजेला नाथांच्या वाड्यातील रांजण भरण्याची प्राचीन परंपरा आहे. २१ फूट खोल व ९ फूट रुंद संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हा रांजण आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे या रांजणाला मोठी धार्मिक परंपरा असून यामुळे भाविकांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नाथांच्या या वाड्यातील रांजणात श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रुपात येऊन १२ वर्षे पाणी भरल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे नाथांचा हा रांजण भाविकांचे श्रद्धास्थान आहे.



भाविकांच्या गर्दी अभावी शांतता!
नाथांच्या प्राचीन वाडा मंदिरातील नाथांचा रांजण भरणे ही नाथषष्टी सोहळ्याची औपचारिक सुरुवात असते. रांजण भरण्याच्या या धार्मिक कार्यक्रमात भाविक जल्लोष ही करतात. परंतु कोरोनामुळे यंदा ही परवानगी नसल्यामुळे भाविकांना उपस्थिती लावता आली नाही. त्यामुळे नाथांच्या वाड्यात जल्लोष नसल्याने शांतता असल्याचे दिसून आले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT