lockdown in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Lockdown: महत्त्वाची बातमी! लॉकडाउनचा कालावधी बदलला; जाणून घ्या बदल

सकाळ ऑनलाईन टीम

औंरंगाबाद: जिल्ह्यात ३० तारखेच्या मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागणार होते आणि ते ८ एप्रिलपर्यंत राहणार होते. पण शासनाने दुसरे परिपत्रक काढत त्यात बदल केला आहे. आता हे लॉकडाउन बुधवारी (३१ मार्च) ते ९ एप्रिलपर्यंत (शुक्रवार) असणार आहे.

याकाळात पुर्वनियोजित परिक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यात सूट दिली आहे. पण विद्यार्थ्यासोबत परिक्षेचे हॉल टिकिट असणे बंधनकारक असणार आहे. तसेच शहरातील पेट्रोल पंपवर पेट्रोल-डिझेल सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कामगार, सामान्य नागरिकांना मिळेल. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असं प्रशासनाने आवाहन केले आहे.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मंगळवार (ता.३१) रात्रीपासून कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे. हे लॉकडाउन ९ एप्रिलपर्यंत असणार आहे.  यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आले असून यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. चौकाचौकांसह गल्लोगल्लीही पोलिसांच्या टू मोबाईल, पीटर वाहनांची पेट्रोलिंग तसेच १६ पोलिस ठाणेंतर्गत ठराविक चौकात पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. पोलिसांच्या मदतीला होमगार्डही असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT