jadhavwadi 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Lockdown: जाधववाडी भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट, टोमॅटो, वांगे फेकली रस्त्यावर

प्रकाश बनकर

औरंगाबाद: जाधववाडी येथील फळे व भाजीपाला मार्केट परिसरात गुरुवार(ता.११) पासून सात दिवस बंद राहणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी काही शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवर अडविल्यामुळे सनी सेंटर येथे काहींनी दुकाने थाटली होती.

पोलिस आल्यानंतर येथील गर्दी कमी झाली. यातील काही व्यापाऱ्यांनी टोमॅटो आणि वांगे रस्त्यावर फेकले. दुसरीकडे आवारात शुकशुकाट दिसून आला. आडत, रासायनिक खते, बियाणे विक्री करणारे दुकाने सुरु होती. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना जागा दिली असताना शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी भाजीपाला-फळे विक्री करतात. आजच्या बंदमध्ये हे दिसून आले.

फळे-भाजीपाला ही अत्यावश्‍यक गोष्ट असल्यामुळे त्यावर बंदी आणू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अनेक शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी शेतमाल विक्री केला. तर अनेकांनी बाजार समितीकडे येणेच टाळले.

जुना मोंढ्यात तपासणी - 
जुना मोंढा परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास पथकाने दुकानांची तपासणी केली. त्यावेळी काही दुकानदारांना दंड लावण्यात आल्याने शाब्दिक वाद झाल्याचे समजते. त्यानंतर पथक प्रमुखांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत जनजागृती केली व त्यानंतर वाद मिटल्याचे सुत्रांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

War Impact on India: पश्चिम आशियातील संघर्ष भारताला किती महाग पडणार? तेल, महागाई, रुपया आणि शेअर बाजारावर वाढला दबाव

IPL 2026: आनंद गगनात मावेना... पाटिदारसह, विराटने धरला ठेका, ढोलच्या गजरात बंगळुरूच्या खेळाडूंचा धुमाकूळ; RCB ने शेअर केला भारी Video

त्या फोटोमध्ये पूजा भट्ट खरंच न्यूड होती का? अखेर अभिनेत्रीने दिली कबुली; म्हणाली, 'मी खरंच इनरवेअर...'

Mumbai-Goa Highway: खारपाडा येथील टोलनाका बंद पाडला, जनआक्रोश समिती आक्रमक; आधी कामे पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Update : लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी पुन्हा रांगा; ऑनलाइन बुकिंगनंतरही ग्राहकांची फरफट

SCROLL FOR NEXT