Aurangabad Measles Disease  
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Measles Disease : गोवरची आणखी ११ संशयित बालके

औरंगाबाद महापालिका हद्दीत गोवर साथीचा उद्रेक झाला असून वॉर्डावॉर्डात गोवर साथीची बालके आढळून येत आहेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिका हद्दीत गोवर साथीचा उद्रेक झाला असून वॉर्डावॉर्डात गोवर साथीची बालके आढळून येत आहेत. शनिवारी (ता.तीन) शहरात गोवरची अजून ११ संशयित बालके आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

शहरात आतापर्यंत गोवरची ८८ संशयित बालके आढळून आली असून शनिवारी (ता. तीन) अजून ११ बालके संशयीत निघाल्याने संशयीत बालकांची एकूण संख्या ९९ इतकी झाली आहे. त्यापैकी ६१ बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातून आतापर्यंत ४४ बालकांचा अहवाल प्राप्त झाला. १७ बालके पॉझिटिव्ह निघाली तर १५ बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि १२ बालकांचा अहवाल प्रलंबित आहे. गोवर बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे.

या संदर्भात माहिती देताना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा म्हणाले की, शनिवारी गोवरची आणखी ११ संशयीत बालके आढळून आले आहेत. यामध्ये बायजीपूरा आरोग्य केंद्रातंर्गत रहेमानिया कॉलनी, गणेश कॉलनी आरोग्य केंद्रातंर्गत कोहीनूर कॉलनी, गांधीनगर आरोग्य केंद्रातंर्गत दलालवाडी, अलमगीर कॉलनी, शिवाजीनगर आरोग्य केंद्रातंर्गत देशमुखनगर, भवानीनगर आरोग्य केंद्रातंर्गत नवाबपूरा, बन्सीलाल आरोग्य केंद्रातंर्गत पदमपूरा येथील मोचीगल्ली, नारेगाव आरोग्य केंद्रातंर्गत सिडको एन-७, जयभवानीनगर आरोग्य केंद्रातंर्गत विश्रांतीनगर, नेहरूनगर आरोग्य केंद्रातंर्गत रहेमानिया कॉलनी या भागात गोवर साथीचे संशयीत बालके निघाली आहेत. या बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते मुंबई येथील हाफकीन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

१२३ बालकांचे लसीकरण

आरोग्य विभागाने ९ महिने ते ५ वर्षेवयोगटातील बालकांचे अतिरिक्त लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (ता. तीन )विजयनगर, नेहरूनगर, चिकलठाणा भागात सहा शिबीरे घेऊन १२३ बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात विजयनगरमध्ये ४२, नेहरूनगरात ३८ आणि चिकलठाणामधील ४७ बालकांचा समावेश आहे. त्यासोबतच नियमितपणे एमआर-१चे १५ आणि एमआर-२ चे २८ बालकांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT