girl torture sakal
छत्रपती संभाजीनगर

'होय... तुमच्या मुलीला पळवून नेतोय'; अल्पवयीन मुलीला पळवत लग्न केलेला आरोपी जेरबंद | Aurangabad Crime

सदर तरुण तब्बल दीड वर्षानंतर पोलिसांना सापडला.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कामानिमित्त जालना जिल्ह्यातून औरंगाबादेत आलेल्या २६ वर्षीय आरोपीने शहानगर, मसनतपूर भागातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेत तिच्याशी लग्न केले.

सदर तरुण तब्बल दीड वर्षानंतर पोलिसांना सापडला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या (एएचटीयू) पोलिसांनी त्याला १८ जानेवारीरोजी पुण्यातून पकडून आले. त्याच्याविरोधात अपहरणासह पोस्को कायद्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राम वसंत मुंडे, (२६ रा. दहिफळ खंदारे, ता. मंठा जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी ही तिच्या बहिणी, दोन भाऊ, आईवडिलासांसह मसनतपूर भागात राहत होती. तिची आई स्वयंपाकाचे काम करत असे, दरम्यानच्या काळात तरुणीची मुकुंदवाडीतील राम मुंडेसोबत ओळख झाली. १६ सप्टेंबर २०२१ रोजी मुलीच्या आईने स्वयंपाकाच्या कामाला गेलेल्या ठिकाणी मुलीला घ्यायला बोलाविले होते. मात्र, मुलीने तिथे जाऊन सुरक्षारक्षाकाच्या मोबाइलवरून रामला फोन करून मुकुंदवाडीत ये असे म्हणाली.

दरम्यान ‘एएचटीयू’च्या टीमने तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी राम हा पुण्यातील लोहगाव (ता.हवेली) येथे असल्याची माहिती टीमला मिळाली. त्यावरून टीमने रातोरात पुणे गाठून आरोपी राम मुंडे याला ताब्यात घेतले.

पळून जाऊन लग्न केल्यानंतर संसार थाटून वर्ष झाल्याने पोलिसांचा आपल्यामागील ससेमिरा संपल्याच्या विचारात आरोपी मुंडे राहत होता. दोघांना एक बाळही आहे. त्याला अटक करून एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुषमा पवार, ईसाक पठाण, खरे, त्रिभुवन, चिंचोळकर, अत्तार यांच्या पथकाने केली.

होय...तुमच्या मुलीला पुण्याला घेऊन चाललोय

पीडितेच्या आईने सुरक्षारक्षकाकडे मुलीबद्दल विचारणा केली असता, सुरक्षारक्षकाने हकीकत सांगिलत्यानंतर पीडितेच्या आईने सुरक्षारक्षकाच्या मोबाइलमधून नंबर घेऊन त्यावर फोन केला असता, राम याने सांगितले की, तुमची मुलगी माझ्यासोबत असून आम्ही पुण्याला जात आहोत, यानंतर फोन करू नका असे सांगत रामने मोबाइल बंद केला. याप्रकरणी रामविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र मुलीचा तपास न लागल्याने अखेर सदर गुन्हा एएचटीयूकडे २० डिसेंबर २०२२ रोजी वर्ग झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अमित शाहंचा फोटो; 'भारताचा चाणक्य' म्हणून वादग्रस्त बॅनर?; काँग्रेसने विरोध करताच पोस्टर गायब

दिल्लीच्या गाजलेल्या CJP आंदोलनावर येणार सिनेमा; पडद्यामागचं 'सत्य' उलगडणार?

अमेरिकेत ट्विटर बॅन करताना दिलेलं कारण मनाला लागलं, म्हणून भारतात आलो; अभिजीत दीपके काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो : अमित ठाकरे

Health Minister Prakash Abitkar : अवैध गर्भपात करणाऱ्या कुटुंबांची आता खैर नाही! डिसेंबरमध्ये येणार नवा कडक कायदा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT