मुलीला किडनी दान करून आईने दिले जीवदान sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : मुलीला किडनी दान करून आईने दिले जीवदान

निर्णयाचे जिल्हाभरातून कौतुक : किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : जन्मदात्या आईने किडनी (Kidney donation) दान करून आपल्या मुलीस जीवदान दिले असून आईच्या या निर्णयाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पांगरी (ता.सिल्लोड) येथील छाया अशोक झरवाल मागील अडीच वर्षांपासून किडनी आजाराने त्रस्त होत्या. दोन वर्षे अगोदर त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान झाले. घटनेमुळे सर्व कुटुंब तणावात गेले. त्यानंतर किडनी रोगतज्ज्ञ डॉ.सचिन सोनी यांनी निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असताना मागील सहा महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया जास्त काळ रुग्णाला वाचवू शकत नाही, हे लक्षात आले. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण करणे हाच एक पर्याय असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

किडनी दाता मिळविणे आणि गुंतागुंतीची खर्चिक शस्त्रक्रिया करणे यामुळे सदर कुटुंबापुढे मोठे संकट उभे राहिले होते. दरम्यान, याबाबत कल्पना छाया झरवाल यांच्या आई रुखमनबाई भावलाल माहोर यांनी एक मोठा निर्णय घेत आपली किडनी मुलीसाठी देण्याची इच्छा बोलून दाखविली. पोटची मुलगी किडनी शिवाय जगणे कठीण असल्याचे माहिती होताच आई लेकीसाठी धावून आली.

सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर १ जानेवारी रोजी डॉ.अभय महाजन, डॉ.चिंचोळे, डॉ.बरनेला, डॉ.प्रदिप मुरके यांच्या टीमने यशस्वीरीत्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली. आई रूखमनबाई यांच्या मातृत्वाच्या वात्सल्याने छाया झरवाल यांना पुनर्जन्म मिळाला असून आईने लेकीसाठी घेतलेल्या निर्णयाचे जिल्‍हाभरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT