Motor Insurance Policy Claims 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : परवान्याविना वाहन विमा असून नसल्यासारखाच!

भरपाईचे दावे पडतात अंगावर, कंपनी करते हात वर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - वाहनासाठी जसा विमा (मोटार इन्शुरन्स) महत्वाचा आहे, तसाच विम्यासाठी आणि वाहनासाठीही वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. तुमच्याकडे वाहनाचा विमा आहे, आणि जर वाहन परवाना नसेल तर विमा असून नसल्यासारखा आहे. वाहनाचा विमा आणि वाहन चालवण्याचा सक्षम परवाना या दोन्ही बाबी पूरक तसेच कायदेशीरही आहेत. विनापरवाना वाहन चालवले तर दंड होऊ शकतो, मात्र दंडापेक्षाही परवाना नसेल आणि अपघात झाला तर आयुष्य उध्वस्तही होऊ शकते याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

वाहनधारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे. तसेच त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे, हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते. वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना (लायसेन्स) अनिवार्य असते. वाहन परवान्याचे तब्बल २४ विविध प्रकार आहेत.

काय होऊ शकते?

विनापरवाना वाहन चालविणाऱ्यास नविन मोटार वाहन कायद्यानुसार ५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंड तब्बल १० पट वाढविण्यात आला आहे. विनापरवाना वाहन पकडले तर दंड भरुन सुटका होऊ शकते, मात्र वाहन परवाना नसताना तुमच्याकडून अपघात झाला तर मात्र मनस्तापाशिवाय काहीही पर्याय नाही. अपघात किरकोळ असेल तर वाहनाचे नुकसान भरून कदाचित सुटका होईल, मात्र अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर वसुलीच्या दाव्याला सामोरे जावे लागते.

विमा क्लेम नाकारला जातो

वाहन चालकाकडे वैध वाहन परवाना असणे ही विमा मिळवण्यासाठीची प्रमुख अट आहे. वाहन परवाना नसेल तर कदाचित विमा पॉलिसी मिळेल पण क्लेम देण्याची वेळ आल्यानंतर विमा कंपनी वैध परवाना नसल्याचे कारण देत हात वर करणार हे निश्चित आहे.

वाहन चालवणाऱ्याकडे वैध आणि सक्षम वाहन परवाना आवश्यक आहे. विनापरवाना वाहन चालवणे कायदेशीर गुन्हा ठरतो तसेच विम्याचा क्लेमही नाकारला जातो. त्यामुळे अपघात न्यायधिकरणाने ठरवलेली दाव्याची लाखोंची रक्कम वाहन चालकाला स्वतः भरावी लागू शकते.

-अरुण बेलवंकी, संकेत मोटार्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT