Aurangabad MSEB officers employees tree plantation
Aurangabad MSEB officers employees tree plantation sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : माळरानावर महापारेषणने फुलविली वनराई

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : शेकडो एकरांवर विस्तारित चारशे के. व्ही. केंद्राच्या विस्तीर्ण प्रांगणात पाण्याअभावी सावली दृष्टीआड झाली होती. मात्र, येथे नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वृक्षरोपणाचा केवळ छंद न जोपासता खडकाळ माळरानावर विविध जातीची झाडे लावून भंगारातील पाण्याच्या जारद्वारे ठिबक सिंचन करुन ती जगविली सुद्धा. सध्या निसर्गाच्या या वनराईमुळे सौंदर्यात भर घातल्याचे चित्र थापटी तांडा (ता.पैठण) येथे पाहावयास मिळत आहे.

थापटी तांडा येथील ४०० के. व्ही. उपकेंद्राचे अभियंते किरण वाणी, गिरीश देशपांडे, अविनाश जोशी, जयंत म्हस्के, प्रवीण महाजन, श्रीनिवास कुरूल्लू, सुभाष भावले, फहीम शेख, ऋषीकेश कुलकर्णी , आकाश शेळके, भागवत पानझडे आदींनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. थापटी तांडा येथे जवळपास दोनशे एकर खडकाळ माळरानावरील ४०० के.व्ही.उपकेंद्रात पिण्याच्या पाण्याची मारामार असल्याने या ओसाड माळरानावर वृक्षारोपणाचा विचार मनात आणणे दुरापास्त होते. या प्रांगणात एक विहीर व एक बोअरवेल असतानाही त्यावर कर्मचाऱ्यांची तहान भागत नव्हती. दररोज टॅंकरने विकतचे पाणी घेऊन त्यावर ते आपली गरज पूर्ण करीत असे. परिसरात कोठेच हिरवाई नसल्याने सावलीसोबतच पक्ष्यांचा आवाजही गायब झाला होता.

दरम्यान, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण वाणी यांनी एका वटवृक्षाचे प्रत्यारोपण करून त्याची सहकाऱ्याच्या वतीने जोपासना करण्याचा केलेला प्रयोग प्रेरणादायी ठरला व त्यांना मोकळ्या जागेवर विविध झाडे लावण्याचा मोह अनावर झाला. त्यांनी तीन वर्षापूर्वी आंबा, जांभूळ, सीताफळ, वड, उंबर, पिंपळ, कडुनिंब, बदाम, निलगिरी आदी झाडे लावली. पाण्यासाठी औरंगाबाद येथून लोकांनी स्क्रॅपमध्ये विकलेली पाण्याचे ८५ जार प्रति पन्नास रुपयास घेऊन ते आपणांस पिण्यासाठी येणाऱ्या टॅंकरवर चार दिवसा आड भरून झाडांजवळ ठेवून तोटीद्वारे ठिबक सिंचन केल्यागत थेंब थेंब पाणी देण्यास सुरवात केली. तीन वर्ष पोटच्या लेकराप्रमाणे शंभरावर झाडांची जोपासना केली.

आता ही झाडे मोठी झाली असून त्याची सावलीही मिळू लागली आहे. एवढेच नव्हे तर माळरानावर या झाडांनी निसर्गाच्या सौंदर्यात भर घातली असून पक्ष्यांचा मधूर किलबिलाट आनंदात भर घालत आहे. कोणत्याही शासकीय निधीचा उपयोग न करता स्वयंफुर्तीने वृक्षारोपण करून अनोख्या प्रयोगातून शंभरावर विविध जातीच्या झाडांची यशस्वी जोपासना करणाऱ्या या अधिकारी-कर्मचाऱ्याचा मुख्य अभियंता मिलिंद बनसोडे, अधिक्षक अभियंता रंगनाथ चव्हाण, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांनी कौतुक करून पुनश्च : उर्वरित रिकाम्या जमिनीवर झाडे लावणेसाठी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT