Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation News sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद महापालिकेकडे थकला ७५ कोटींचा कर जिल्हाधिकाऱ्यांचं प्रशासकांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील मालमत्तांचा अकृषिक कर वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिकेकडे तब्बल ७५ कोटी ४६ लाख रुपयांचा अकृषिक कर थकलेला आहे. ही थकीत रक्कम शासनाकडे जमा करावी, असे पत्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना पाठवले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.तीन) अकृषिक करासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत पालिका अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Aurangabad Municipal Corporation News)

शहरी भागात कराची वसुली एकत्रित व सहजरीत्या एकाच यंत्रणेकडून करणे सोयीचे ठरते. यामुळे महसूल व वनविभागाने पाच फेब्रुवारी २००९ नुसार शासन निर्णयाद्वारे पालिकेवर अकृषिक करवसुलीची जबाबदारी दिली आहे. पालिका मालमत्ताधारकांकडून वेळोवेळी आकारत असलेल्या करांच्या वसुलीबरोबरच अकृषिक कराचीही वसुली करण्याची कार्यवाही करावी, अशी तरतूद केलेली आहे. शासन निर्णयान्वये फक्त अकृषिक आकारणी वसुलीचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार पालिका क्षेत्रात आयुक्त पालिका यांना दिलेले आहेत.

पालिका अकृषिक कराच्या मागणीच्या रकमा वसूल झाल्यानंतर शासन कोषागारात महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ८ च्या तरतुदीनुसार विहित केलेल्या मुदतीमध्ये भरणा करतील व भरणा केलेल्या रकमेच्या चलनाची एक प्रत त्याचवेळी जिल्हाधिकारी यांना सादर करेल. मात्र, काही वर्षांपासून औरंगाबाद पालिकेकडे जमा होणारा महसूल हा मुदतीत शासन खाती जमा करण्यासाठी धनादेश सुपूर्द केले जात नाहीत. तसेच पालिकेकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी दिसून येत असल्याचे अपर तहसीलदारांनी या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पालिकेकडे असलेल्या थकबाकीमुळे जिल्ह्यासाठी शासनाद्वारे निश्‍चित वसुलीचा इंष्टाक साध्य करण्यामध्ये अडचणी येत आहेत. पालिकेकडे अकृषिक कराच्या मागील थकबाकीसह एकूण रक्कम ७५.४६ कोटी रुपये थकीत आहेत, ही रक्कम तातडीने भरावी, असेही या पत्रात प्रशासनाने नमूद केलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT