Aurangabad municipal corporation sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad News : गुंठेवारीसाठी नऊ हजार फायली; मिळाले ११४ कोटी

राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद - राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाने गेल्या १७ महिन्यांत १० हजार २३७ फायलीपैकी नऊ हजार ३६३ फायली मंजूर केल्या आहेत. त्यातून महापालिकेला ११४ कोटी ७२ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गुंठेवारीसाठी १०० टक्के शुल्क आकारले जात असल्याने सध्या महापालिकेकडे दाखल होणाऱ्या फायलींची संख्या रोडावली आहे.

गुंठेवारी अधिनियमाला मुदतवाढ मिळाल्यानंतर महापालिकेने प्रभागनिहाय स्वतंत्र कक्ष स्थापन करून फायली तयार करण्यासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती केली. सुरवातीला गुंठेवारी नियमितीकरणासाठी १५०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामासाठी रेडीरेकनर दराच्या ५० टक्के शुल्क आकारणी होत होती. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शुल्क माफी कमी करण्यात आली. मे २०२२ पासून रेडीरेकनरच्या १०० टक्के शुल्क आकारणी सुरू झाली आहे.

त्यामुळे फायली दाखल करण्याचे प्रमाण कमी होत आहे. नऊ जुलै २०२१ ते २३ डिसेंबर २०२२ पर्यंत महापालिकेकडे १० हजार २३७ फायली दाखल झाल्या असून, सतरा महिन्यांत केवळ नऊ हजार ३६३ मालमत्तांची गुंठेवारी नियमित केली. त्यातून ११४ कोटी ७२ लाख ६१ हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

सातारा-देवळाईत सर्वाधिक प्रतिसाद

गुंठेवारीला सातारा-देवळाई भागात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. प्रभाग आठमधून आतापर्यंत चार हजार ५९३ फायली दाखल केल्या. त्यापैकी चार हजार १५७ फायली मंजूर झाल्या. त्यातून ६८ कोटी ९६ लाख २४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक सातमधून एक हजार ३५८ फायली, प्रभाग चारमधून १२०६ फायली मंजूर झाल्या आहेत. १७६ मालमत्ताधारकांनी फायली दाखल केल्या; पण शुल्क भरले नाही, त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT