Aurangabad News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad News : होर्डिंग धोरण अद्याप निश्‍चित नाही

निर्णय दरवेळीप्रमाणे पुन्हा बारगळण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरात होर्डिंग पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र अजूनही ही पॉलिसी निश्‍चित झालेली नाही. १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होर्डिंग काढण्यासाठी विशेष मोहीम राबवून प्रशासनाने औपचारिकता पूर्ण केली. ही मोहीम होऊन बारा दिवस उलटले तरी होर्डिंग पॉलिसी अजून कागदावर देखील उतरलेली नाही.

होर्डिंग पॉलिसी निश्‍चित करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशान्वये प्रभाग कार्यालयांना याबाबत पत्र पाठवले आहे. मात्र प्रभागनिहाय अजून जागांची यादीच निश्‍चित झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शहर विद्रुप होवू नये, यासाठी पालिकेने ठरवून दिलेल्या जागीच यापुढे बॅनर आणि झेंडे लावण्यात येतील, असे आदेश प्रशासक डॉ. चौधरी यांनी काढलेले आहेत.

आठ बाय बारा, आठ बाय दहा, आणि पाच पाच आठ या आकारातच आता बॅनर लावण्यासाठी परवानगी असणार आहे. यासाठी प्रतिदिवस दरही ठरवण्यात येणार आहे. पाच दिवसांच्या पुढे हे बॅनर ठेवता येणार नाही. असे काही नियत प्रशासकांनी मागील आठवड्यात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते. त्यावेळी होर्डिंग पॉलिसी लवकरच निश्‍चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र अद्याप धोरण काही निश्‍चित झालेले नाही. शहरातील जागा निवडण्याचे काम नऊ प्रभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र जागा निश्‍चितीची यादीच तयार झालेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासकांनी घेतलेला निर्णय दरवेळीप्रमाणे पुन्हा बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT