Aurangabad water supply News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : महापालिकेने पळवले उद्योगांचेही पाणी!

एमआयडीसीतील उद्योगांना मागवावे लागताहेत टॅंकर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सर्वांत जुनी औद्योगिक वसाहत असलेल्या चिकलठाणा एमआयडीसीतील उद्योगांच्या हक्काच्या पाण्यावर महापालिकेने डल्ला मारला आहे. सिडको एन-५ येथील जलकुंभावरील टॅंकर हे प्रोझोन मॉलच्या बाजूला असलेल्या एमआयडीसीच्या जलकुंभाकडे वळविल्यामुळे उद्योगांच्या हक्काचे दोन एमएलडी पाणी पळविल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. त्यामुळे अनेक उद्योगांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत.

शहराला लागून असलेल्या या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या अनेक अडचणी आहेत. आता पाणीही पळविले जात आहे. गेल्या मार्च ते एप्रिलपासून चिकलाठाणा एमआयडीसीतील कंपन्यांना मिळणाऱ्या पाण्यापैकी दोन एमएलडी पाणी हे महापालिकेला देण्यात येत आहे. महापालिका टँकरच्या माध्यमातून हे पाणी शहरातील विविध भागात पोचवित आहे. तेव्हापासूनच एमआयडीसीला दोन एमएलडी पाणी कमी येत आहे. यामुळे नियमित मिळणाऱ्या पाण्यापेक्षा १५ ते २० टक्के पाणी पुरवठा कमी होतो.

चिकलठाणा एमआयडीसीवर एक नजर

१००० ते १२०० कंपन्या

५०० ते ६०० छोटे युनिट

चिकलठाणा, शेंद्रा येथे चार दिवसांपासून टंचाई

चिकलाठाणा एमआयडीसीत पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनी लाइनची अडचण आल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाला होता. उद्योजकांना टॅंकरने पाणी आणावे लागले. अशाच प्रकारे पाणी टंचाई ही शेंद्रा एमआयडीसीतही झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

चिकलाठाणा एमआयडीसीतील बहुतांश उद्योगांवर यामुळे परिणाम जाणवला. महापालिकेने घेतलेल्या दोन एमएलडी पाण्यामुळेच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेतर्फे एमआयडीसीच्या घेतलेल्या पाणीपुरवठ्याचे पैसेही महापालिकेतर्फे वेळेवर भरणा केली जात नसल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT