Aurangabad Municipal Corporation 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : अधिकाऱ्यांना डेडलाईन

महापालिकेत सांगलीच्या धर्तीवर ‘झेड रेफरन्स’ पद्धत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेतील लालफीतशाहीचा फटका नागरिकांना वारंवार बसतो. एखादी समस्या घेऊन गेल्यानंतर वारंवार निवेदने देऊन नागरिक बेजार होतात; पण प्रश्‍न मार्गी लागत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावून त्यांना दिलासा देण्यासाठी महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘झेड रेफरन्स’ पद्धत महापालिकेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या नागरिकाचे महत्त्वाच्या प्रश्‍नावर निवेदन प्राप्त होताच प्रशासक त्यावर ‘झेड रेफरन्स’ने आवक व जावक क्रमांक टाकतील. संबंधित अधिकाऱ्याला प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ दिला जाईल. सांगली शहरात डॉ. चौधरी यांच्या या पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

शहरात रस्त्यावर पडलेले खड्डे, ड्रेनेज चोकअप, बंद पथदिवे, अतिक्रमण यासारख्या अनेक तक्रारी घेऊन नागरिक महापालिकेत येतात. आवक-जावक विभागात अशा प्रकारच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. अनेक जण तक्रारी घेऊन थेट प्रशासकांना भेटतात. यातील काही तक्रारी क्षुल्लक असतात. त्यासाठी नागरिकांना थेट प्रशासकांना भेटण्याची गरज नसते. अनेक निर्णय विभाग प्रमुखापर्यंत होणे अपेक्षित आहे.

मात्र विभागप्रमुख टोलवाटोलवी करतात. त्यामुळे नागरिक थेट प्रशासकांकडे येतात. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी सांगलीच्या धर्तीवर ‘झेड रेफरन्स’ ही पद्धत सुरू केली आहे. त्यानुसार डॉ. चौधरी यांनी अध्यादेश काढला आहे. त्यात नागरिकांकडून प्राप्त होणारी निवेदने, तक्रारी प्राधान्याने सोडविण्यासाठी सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सहायक आयुक्त, उपअभियंता यांना आदेशित केले आहे.

दोन आठवड्यांची मिळणार मुदत

प्रशासकाकडे येणाऱ्या तक्रारीचे स्वरूप पाहून त्यावर ‘झेड रेफरन्स’ लिहिलेले असेल तर किमान १५ दिवसांत त्या तक्रारीबाबत अहवाल सादर करणे बंधनकारक असेल. ज्या अधिकाऱ्याकडे अर्ज सोपविण्यात आला आहे, त्याला मोबाइल एसएमएसद्वारे अलर्टही पाठविण्यात येईल. त्यात तक्रार अर्ज क्रमांक, कालावधी आदी तपशील राहील. नियोजित वेळेत अहवाल प्राप्त न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे विचारणा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT