Aurangabad municipal corporation Pay and Park 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : ‘पे अँड पार्क’ लवकरच

शहरात एक ऑगस्टपासून सात ठिकाणी होणार प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - शहरात सात ठिकाणी महापालिकेतर्फे एक ऑगस्टपासून ‘पे अँड पार्क’ तत्त्वावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दोन महिने ही सेवा विनाशुल्क असेल, त्यानंतर वाहन पार्क करणाऱ्यांना पैसे मोजावे लागतील, असे स्मार्ट सिटीतर्फे सांगण्यात आले.

महापालिकेने अद्याप पार्किंग धोरण ठरविले नव्हते. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानातून पार्किंग धोरण तयार केले जात आहे. त्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी पार्किंग धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पार्किंग धोरणाबद्दलचे सादरीकरण सोमवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात करण्यात आले. त्याविषयी स्मार्ट सिटीच्या माध्यम विश्लेषक अर्पिता शरद यांनी सांगितले, की पे अँड पार्कसाठी ‘करब्लेट अॅप’ तयार करण्यात आले आहे.

हे अॅप आपले वाहन पार्क करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप डाऊनलोड केल्यावर त्या आधारे पार्किंगच्या जागेवर वाहन पार्क करण्यासाठी स्लॉट आहे का याची माहिती मिळणार आहे. स्लॉट आहे असे लक्षात आल्यावर संबंधित व्यक्तीला वाहन पार्क करण्यासाठी अॅपच्या आधारेच जागा निश्चित करुन घ्यावी लागणार आहे. अॅपच्याच आधारे ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पार्किंगच्या जागीदेखील पेमेंटची व्यवस्था केली जाणार आहे. क्युआरकोड स्कॅनकरुन नागरिकांना पार्किंगचे शुल्क भरता येणार आहे.

याठिकाणी असेल सुविधा

पार्किंगची सुविधा एक ऑगस्टपासून सिडको कॅनॉट प्लेस, निराला बाजार, उस्मानपुरा, अदालत रोड, सूत गिरणी चौक, पुंडलिकनगर, टीव्ही सेंटर या सात ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सुरु केली जाणार आहे. एक ऑगस्टला सिडको कॅनॉट प्लेस येथे या उपक्रमाचे उद्‍घाटन केले जाणार आहे. सुरवातीला दोन महिने ही सुविधा विनामूल्य असेल. त्यानंतर नागरिकांना पैसे मोजावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी ग्राहकांना मोठा झटका, सिलिंडरच्या किमतीत वाढ

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

SCROLL FOR NEXT