Aurangabad amc news
Aurangabad amc news 
छत्रपती संभाजीनगर

आता मंगल कार्यालये, शादीखाने बंद...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व मंगल कार्यालये, शादीखाने बंद ठेवण्यात यावेत. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत घेण्यात येऊ नयेत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

शहरात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. महापालिकेने कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असून, सर्वसाधारण सभा, बैठका व इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून, काय खबरदारी घ्यायची याविषयी जनजागृती केली जात आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शहरातील मंगल कार्यालये व शादीखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. ३१ मार्चपर्यंत नागरिकांनी लग्नसमारंभ व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहनदेखील महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीला देणार नोटीस 
कोरोना व्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी देशभर उपाययोजना केल्या जात असल्या तरी कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. येथे भाजीपाला विक्रेत्यांसह खरेदीदारांचा वावर सुरूच असून, समितीने तातडीने उपाययोजना कराव्यात म्हणून महापालिकेतर्फे नोटीस बजावण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता. १७) दिले आहेत. तसेच बाजार समितीने स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे अधिकाऱ्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणू दिले. त्यावर महापौरांनी बाजार समितीला नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

महापालिकेत नियंत्रण कक्ष उघडणार 
कोरोनासंदर्भात वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना कोरोनासंदर्भात माहिती देण्यासाठी व मदतीसाठी महापालिकेच्या मुख्यालयात नियंत्रण कक्ष उघडला जाणार आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी व आरोग्य विभागाचे एक पथक कार्यरत राहील, असेही महापौर घोडेले यांनी सांगितले. 

स्वयंसेवी संस्था करणार महापालिकेला मदत 
कोरोना व्हायरससंदर्भात उपाययोजना करण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी महासंघ, क्रेडाई, हॉटेल असोसिएशन, कापड व्यापारी असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब या संघटनांची बैठक घेण्यात आली. क्वॉरंटाईन वॉर्ड तयार करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. व्यापारी महासंघाने शहरात रिक्षांवर भोंगे लावून व होर्डिंग लावून जनजागृती करण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. शहरातील मुख्य व्यापारी प्रतिष्ठानांच्या ठिकाणी स्टॉल लावून हँडवॉश, सॅनेटायझर, मास्क उपलब्ध करून दिले जातील. कपडा व्यापारी असोसिएशनतर्फे जास्तीत जास्त मास्क विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील, असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT