aurangabad news
aurangabad news 
छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतरही महापालिकेची दिरंगाई

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- शहरातील रस्त्यांसाठी 267 कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मंजुरी घेऊन आठवडाभरात शासनाकडे सादर करण्यात यावा, असे आदेश दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले होते; मात्र अद्याप सुधारित डीपीआर तयार झालेला नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही महापालिका सुस्त आहे. 

एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, तर दुसरीकडे शासनाकडून मिळालेला निधी खर्च करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. रस्त्यांसाठी दिलेला शंभर कोटींचा निधी अडीच वर्षांनतरी खर्च झालेला नाही. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यांसाठी पुन्हा 125 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र यादीवरून पुन्हा वाद लागला व तो आतापर्यंत मिटलेला नाही. तत्कालीन आयुक्तांनी व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांचे स्वतंत्र प्रस्ताव शासनाला सादर केले होते.

पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या यादीत 105 रस्ते असून, त्यासाठी 267 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी मिळवा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात आले असताना मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सुधारित प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मान्यता घेऊन शासनाकडे आठ दिवसांत पाठवा, असे आदेश दिले; मात्र दोन आठवडे उलटले तरी महापालिकेने सुधारित डीपीआर तयार केलेला नाही. 
 
दोन आठवड्यांनंतरही काम सुरूच 
महापौर नंदकुमार घोडेले यांनी याविषयी शुक्रवारी (ता.24) कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी यश इनोव्हेशन या पीएमसीच्या मदतीने सुधारित डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. हे काम आणखी तीन दिवस चालणार असून, त्यानंतर प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मान्यता घेतली जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाकडे जाईपर्यंत फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्‍यता आहे. 
 
रस्त्यांची संख्या होणार कमी 
शासन निधीतून मोठी म्हणजेच विकास आराखड्यातील रस्त्यांचीच कामे करावीत, अशी शासनाची अपेक्षा आहे. त्यानुसार पीएमसी व महापालिकेचे अधिकारी सुधारित डीपीआर तयार करत आहे. शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात 105 रस्त्यांचा समावेश होता. त्यातील सुमारे 15 रस्ते गल्लीबोळातील आहेत. हे रस्ते वगळले जाणाची शक्‍यता आहे. त्यामुळे नवा प्रस्ताव हा सुमारे 90 रस्त्यांचा असू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT