Water-Jar sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : तुमच्या शरीराला आवश्‍यक खनिजे फक्त महापालिकेच्या पाण्यातच

जारचे पाणी शुद्ध की नळाचे?

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जारच्या पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाणी शुद्ध म्हणजेच शरीराला पोषक असल्याचा दावाही केला जातो. पण, खरेच जारचे पाणी शुद्ध आणि शरीराला पोषक आहे का? हा विषय वादाचा बनला आहे. जार व आरओ मशीनमधून मिळणाऱ्या पाण्यात शरीराला आवश्‍यक खनिजे नसतात तर ती फक्त महापालिकेच्या पाण्यात असतात, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. शहरात २०० ते ३०० जारचे पाण्याचे व्यावसायिक आहेत. प्रत्येक किराणा दुकानांतून जारच्या पाण्याची विक्री होते. पण, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. विशेष म्हणजे पाण्यावर प्रक्रिया करताना तब्बल ६० टक्के पाणी वायाही जाते.

औरंगाबाद शहर परिसरातील बहुतांश भागात महापालिकेचे नळ नाहीत. त्यामुळे नागरिकांना वर्षाचे बाराही महिने जारच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. विशेषतः सातारा-देवळाई, चिकलठाणा, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी, पिसादेवी, मुंकुदवाडी रेल्वेस्टेशन पलीकडील भागात जार व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे. शहर परिसरात २०० ते ३०० जारचे व्यावसायिक आहेत. अनेक जण घरोघरी जार पुरवितात तर काही जण किराणा दुकानांमार्फत जारची विक्री करतात. किराणा दुकानावर ३० रुपयांना २५ लिटरचा एक जार दिला जातो. शुद्ध पाणी म्हणून जारच्या पाण्याची क्रेज वाढत आहे.

लग्न, धार्मिक सोहळे, मेळाव्यांमधूनही जारचेच पाणी वापरले जाते. मात्र खरेच हे जारचे पाणी तुमच्या आरोग्यासाठी शंभर टक्के चांगले आहे का? यावर आता खल सुरू झाला आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूकही होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यासंदर्भात महापालिकेचे उपअभियंता मनोज बाविस्कर यांनी सांगितले की, प्रक्रियायुक्त पाणी पिण्यासाठी योग्य मानले जाते. पण, त्यासाठी कोणते पाणी वापरले जाते? पाण्यावर प्रक्रिया कशी होते? प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या चाचण्या होतात का? हे विषय महत्त्वाचे आहेत. महापालिका नाथसागरातून पाणी उचलते.

त्यानंतर या पाण्याची गढुळता कमी करण्यासाठी त्रुटीचा डोस देऊन पाण्यातील घातक जीव-जंतू मारण्यासाठी क्लोरिनचा वापर केला जातो. पिण्यायोग्य पाणी २५० टीडीएस असलेले योग्य मानले जाते. पण, अनेक घरांमध्ये लावलेल्या आरओ प्लांटमधील पाण्याचा टीडीएस २० ते २५ पर्यंत असल्याचे चाचण्यांमधून समोर येते. त्यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणामही होतो. महापालिकेतर्फे शहराला पुरविल्या जाण्याऱ्या पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? याची तपासणी करण्यासाठी मुख्य पाइपलाइनसह विविध भागांतून नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले जातात, त्यात केमिकल, बॅक्टारॉजिकल संदर्भातील तपासण्या केल्या जातात असे श्री. बाविस्कर यांनी सांगितले.

‘टीडीएस’ म्हणजे काय?

पाण्यातील शुद्धतेच्या मापनासाठी टीडीएस म्हणजेच ‘टोटल डिमान्ड सॉलिड्स’. यात पीएच आणि कठीणतेचे प्रमाण मोजले जाते. मानवी शरीर जास्तीत जास्त ५०० ते १५०० टीडीएस सहन करू शकते. यापेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी हे शरीरासाठी घातक ठरते. टीडीएस ३०० मिलिडॉम लिटरपेक्षा कमी असेल तर उत्कृष्ट असते.

नियंत्रण कोणाचे?

पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीत महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य असून, जारच्या पाण्यात पीएच घटक कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. पीएच कमी झाल्यास पित्ताचा त्रास वाढतो. सर्वच आरओ प्लांटमधील पाणी हे अशुद्ध आहे किंवा शुद्ध आहे, याची हमी कोणी देऊ शकत नाही. आरओ प्लॅटच्या पाण्याची तपासणीच केली जात नाही. जारच्या व्यवसायावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले तर अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणते, आरओ प्लांटच्या नियंत्रणाचे अधिकार न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

कारण ते जमिनीतून पाण्याची उपसा करतात. याबाबत नागपूरच्या वॉटर बोर्डाकडून याची परवानगी मिळते. आमच्या कायद्याच्या अंतर्गत हा विषय येत नाही. आमच्याकडे फक्त वाटलीबंद पाण्याचा विषय येतो. तर मग जार प्लांटवर कोणाचे नियंत्रण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पी.एच. म्हणजे काय?

पी.एच. म्हणजे पोटॅन्शिअल ऑफ हायनचे प्रमाण. पी.एच. मूल्य किंवा सामू असेही म्हटले जाते. सामू हे द्रावण आम्ल आहे. विम्लता आणि आम्लता मोजण्याचे एकक आहे. पाण्यामध्ये यांचे योग्य प्रमाण हे मिलिग्रॅम/लिटरला ६.५ ते ८.५ पेक्षा अथवा कमी झाल्यास शरीरातील जो रासायनिक क्रिया योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे पित्ताचे प्रमाण वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जारच्या पाण्याचा वापर वाढत आहे. पण, पाण्यावर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. सुमारे ६० टक्के पाणी वाया जाते. प्रत्येकाच्या शरीराला आवश्‍यक खनिज पाण्यावर प्रक्रिया करून काढले जातात. त्यामुळे लहान मुलांचे हाडे ठिसूळ होण्याबरोबरच इतर आजार होऊ शकतात.

- एम. बी. काझी, पाणीपुरवठा विभागप्रमुख महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT