Aurangabad Municipality Fine Against Illegal Water Tap 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : व्यावसायिक मालमत्तांना गुन्ह्यासोबत आता दंडही

बेकायदा नळांविरोधात सोमवारपासून मोहीम होणार तीव्र

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेने बेकायदा नळांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने शहरातील हॉटेलच्या बेकायदा तीन इंचाच्या नळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारपासून बड्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे. बेकायदा नळप्रकरणी आता गुन्हाही दाखल होईल आणि दंडही आकारला जाणार असल्याचे पथकप्रमुख तथा मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.

शहरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानुसार महापालिकेने ४२ कलमी कार्यक्रम हाती घेऊन उपाययोजना सुरू केल्या. त्यात मुख्य पाइपलाइनवरील बेकायदा नळ तोडण्याच्या कामाचा समावेश होता. दरम्यान, न्यायालयानेदेखील बेकायदा नळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बेकायदा नळांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके स्थापन केली आहेत. या पथकांमार्फत १७ जूनपासून आतापर्यंत ८९९ बेकायदा नळांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान याप्रकरणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात सुनावणी झाली असता, हॉटेलच्या बेकायदा तीन इंची कनेक्शनवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले. त्यानुसार सोमवारपासून मोठ्या आस्थापनेवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने मुख्य पाइपलाइनवरून बेकायदा नळ घेणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी देखील देण्यात आल्या आहेत. आता बड्या आस्थापनेवर कारवाई केल्यानंतर गुन्ह्यासोबत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे श्री. वाहुळे यांनी सांगितले.

तेरा व्यावसायिक नळांवर कारवाई

शनिवारी श्री. वाहुळे यांच्या पथकाने पाटीदार भवनाजवळ, अमरप्रीत हॉटेलसमोर, व्यावसायिक अवैध नळजोडण्या तोडल्या. दुपारी दीड ते सायंकाळी पाचपर्यंत ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता किरण तमनार, कर्मचारी मोहमंद शरीफ, तमिझ पठाण, वैभव भटकर, सागर डिघोळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT