Aurangabad Municipality 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : महापालिकेने एका छताखाली उपलब्ध कराव्या सर्व सुविधा

क्रेडाई असोसिएशनची सहकारमंत्री अतुल सावेंकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महानगरपालिकेत बांधकाम व्यावसायिकांसाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी. यातून वेळेचा अपव्यय टाळून कामांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर एक खिडकी योजना राबवावी, अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. या मागण्याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे सावेंनी सांगितले.

क्रेडाईच्या रविवारी (ता.२८) झालेल्या सर्वसाधारण सभेत सहकारमंत्री सावे बोलत होते. राजेंद्रसिंग जाबिंदा, प्रमोद खैरनार, देवानंद कोटगिरे, पापालाल गोयल, सुनील पाटील, रवी वट्टमवार आणि नरेंद्र सिंह जाबिंदा यांची प्रमुख उपस्थिती होती.

सिटी सर्वेची हद्द वाढविण्यात यावी. त्याचप्रमाणे शासनातर्फे फंडिंग घेऊन सर्वे करून सातबाराचे रूपांतर पीआर कार्डमध्ये करण्याची तरतूद करावी. शहराचा विकास होण्यासाठी शहरात मोठे उद्योग येण्यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न व्हावेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

प्रलंबित पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास शहराचा विकास वेगाने होईल. औरंगाबाद प्राधिकरण अंतर्गत सिडकोच्या २६ गावांचा समावेश करावा. सिडकोमध्ये टीडीआर वापरण्याची परवानगी द्यावी. तसेच औरंगाबाद शहरातील सिडकोचा प्रलंबित ईपीआय व महापालिकेचा डीपी प्लॉन लवकर पूर्ण करावा, या प्रमुख मागण्या क्रेडाईतर्फे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी केले.

यावर सहकारमंत्री सावे म्हणाले, की शहराच्या विकासासाठी बांधकाम व्यवसायाचे मोठे योगदान आहे. शहर आखीव रेखीव करण्याचे काम बिल्डर करतात. आपण केलेल्या मागण्या माफक असून त्या शासन दरबारी मांडून पाठपुरावा करून पूर्ण करणार ,तसेच औरंगाबाद क्रेडाई आणि मुख्यमंत्र्याची भेट घालून देणार असे आश्वासन सावेंनी बांधकाम व्यावसायिकांना दिले.

क्रेडाईचे सचिव अखिल खन्ना, विकास चौधरी, संग्राम पठारे, अनिल मुनोत, सुनील राका, पंजाब तौर, रोहित सूर्यवंशी, अजित बापट, बालाजी येरावर, प्रशांत अमिलकंठवार, दीपक कुलकर्णी, भावेन सुखिया, विनोद अग्रवाल, गोपेश यादव, समीर मालखरे, नीलकंठ नागपाल, सौरभ गुप्ता, साहिल कासलीवाल, श्वेता भारतीय आणि हेमा सुखिया उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT