Aurangabad Nala cleaning work is 80 percent complete 31May deadline sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : मोठा दिलासा यंदा तुंबणार नाहीत नाले

प्रशासकांची अधिकाऱ्यांना ३१ मेची डेडलाईन; सफाईचे काम ८० टक्के पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आल्यामुळे महापालिकेतर्फे नालेसफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्रशासक श्री. पांडेय यांनी शुक्रवारी शहरातील नाले सफाईच्या कामाचा आढावा स्मार्ट सिटी कार्यालयात घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त सोमनाथ जाधव, उपायुक्त अपर्णा थेटे, उपायुक्त नंदा गायकवाड, कार्यकारी अभियंता भागवत फड, यांत्रिकी विभागचे उप अभियंता देविदास पंडित, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासह वॉर्ड अभियंत्यांची उपस्थिती होती. बैठकीत प्रशासक म्हणाले, पाणी साचण्याच्या ठिकाणी निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.

कुठेही पावसाचे पाणी अर्धा तासापेक्षा जास्त पाणी थांबणार नाही, याची काळजी घ्या, नाल्यातून काढलेला गाळ खामच्या बाजूला एका जागेत टाकावा, कचरा नाल्याचा काठावर टाकू नये, गाड्यांची फेऱ्या किती झाल्या, याची पडताळणी होईल. मोठ्या नाल्यांच्या कामांची पाहणी केली जाईल.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आढावा घेतला जाईल. उद्यान विभागाकडून नाल्यांवर १४ ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. ३० नाल्यांवर जाळ्या बसवण्याचे काम लवकरात होईल, असे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

जूनमध्ये कमल तलावाची सफाई

पाऊस सुरू झाल्यानंतर महापालिकेची यंत्रणा वापरून कमल तलावाची सफाई, रुंदीकरण व खोलीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी इकोसत्त्व ही संस्था महापालिकेला मदत करणार आहे, असे पांडेय यांनी सांगितले. तलावाची सीमा निश्‍चित करून नाल्यात सोडले जाणारे ड्रेनेजचे पाणी बंद करावे, अशी सूचना त्यांनी केली.

दीड महिन्यापूर्वी सुरू झाले होते काम

नाले सफाईचे काम दीड महिनाभरापूर्वी मार्चमध्ये सुरू झाले होते. शहरात ११५ किलोमीटरचे अंतराचे नाले आहेत. ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदा देखील ठेकेदार न लावता महापालिकेची यंत्रणा वापरून नाले सफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे पैशांची बचत झाल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT