Aurangabad caste colonies sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : जातिवाचक वसाहतींची नावे बदलण्याची गरज आहे काय?

१०४२ जणांचे आले आक्षेप; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील जातिवाचक वस्त्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. पण शहरातील ५० जातिवाचक वसाहतींची नावे बदलण्याची गरज आहे का? शासनाचे हे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आक्षेपांव्दारे करण्यात आली आहे. तब्बल एक हजार ४२ जणांनी आक्षेप दाखल केले आहेत.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने जातिवाचक गावांची नावे, शहरातील वस्ती, रस्ते, चौकांची नावे बदलण्याचा निर्णय घेत अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. महापालिकेने त्यानुसार तयारी सुरू केली होती. या संदर्भात उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, वॉर्ड अधिकाऱ्यांनी ५० वसाहतींची नावे वगळण्याची यादी सादर केली. नवे नावे काय ठेवायची? व नावे बदलण्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार १०४२ नागरिकांनी आक्षेप सादर केले आहेत. यात सर्वाधिक आक्षेपात हा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काहींनी नावे बदलल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

अशी आहे यादी

  • प्रभाग १ : डिंबर गल्ली, ब्राम्हण गल्ली , कुंभार गल्ली, मल्लावपूरा, बेगमपूरा, भिल्ल गल्ली, भिमनगर, भंगीवाडा, मांगवाडा (भावसिंगपूरा गाव), चांभारवाडा (भिमनगर, भावसिंगपूरा गाव), बौध्दवाडा, मोमीनपूरा, लोटाकारंजा, माळीवाडा (बारुदगर नाला).

  • प्रभाग २ : धोबीघाट (काचीवाडा), तेलंगवाडा गवळीपूरा, बोहरी कठडा, जोहरीवाडा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, पारधीपूरा भोईवाडा, बौद्धवाडा (पैठणगेट), कैकाडीवाडा, भोईवाडा.

  • प्रभाग ४ : गोंधळवाडा, धनगर गल्ली, सोनार गल्ली, ब्राम्हण गल्ली, मांगवाडा, कैकाडी गल्ली, चांभार गल्ली, एकतानगरातील चांभार गल्ली, कोळीवाडा, सोनार गल्ली.

  • प्रभाग ५ : भाटनगर, पटेलनगर, चौधरी कॉलनीतील, पटेलनगर.

  • प्रभाग ६ : खाटीक गल्ली (कुरेशी गल्ली) धनगरवाडा, साठेनगर (मांगवाडा) बौध्दवाडा, सुतार वाडा, माळी गल्ली, कुंभारवाडा, तेलीगल्ली, मुल्लागल्ली, ब्राम्हण गल्ली, चांभारवाडा.

  • प्रभाग ७ : बौध्दवाडा (गोंधडीपूरा), वैदुवाडा (वैदू मंदिर)

  • प्रभाग ९ : बौद्धनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT