Aurangabad NCP Women against Ketki Chitale statement about Sharad Pawar sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : केतकी चितळे विरुद्ध राष्ट्रवादीची निदर्शने

शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी शहर महिला आघाडीतर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळेंच्या विरोधात शनिवारी राष्ट्रवादी शहर महिला आघाडीतर्फे सूत गिरणी चौकात निदर्शने करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देत केतकी चितळे यांच्या फोटोला काळे फासून निषेध करण्यात आला. तसेच जवाहर नगर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.

शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांचे राजकारण, समाजकारण, लोकनेते म्हणून उभी हयात गेलेली आहे. राज्याला विविध क्षेत्रामध्ये गती देऊन लोकविकासाचे काम शरद पवार यांनी केले आहे. अशा नेत्या विरोधात चितळे यांनी समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. अशी प्रवृत्ती समाजाला घातक आहेत. यामुळे केतकी चितळे विरोधात गुन्हा नोंदवावा व अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला अध्यक्ष मेहराज पटेल, युवती शहराध्यक्ष अंकिता विधाते, धनश्री तळवळकर, शिल्पा भोसले, मंजूषा पवार, सुरेखा जगताप, शकीला खान शमा परवेझ, कविता होळकर, संघमित्रा खंदारे, कविता वर्षा कल्याणी काकडे, स्नेहल शिर्के, सुप्रिया जाधव, पूजा जगताप, पूजा आंबे, शकीला खान, सुवर्णा जगताप उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT