dcc bank aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात; दिग्गजांची माघार

प्रकाश बनकर

औरंगाबाद: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २१४ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६६ अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले होते तर, बुधवारी (ता.१०) ८४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ६४ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, अंबादास मानकापे, बँकेचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांनी माघार घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली.

निवडणूकीत अर्ज माघार घेण्याची बुधवारी शेवटची तारीख होती. दुपारी तीनपर्यंत बँकेत उमेदवार, कार्यकर्त्यांची रेलचेल दिसून आली. निवडणूकीसाठी औरंगाबाद, सोयगाव, खुलताबाद, सिल्लोड सोसायटी मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवार उरल्याने तेथे दुरंगी लढती होती.

कन्नड, पैठण सोसायटी मतदारसंघात प्रत्येकी ३, फुलंब्री मतदारसंघात ४, तर वैजापूर आणि गंगापूर सोसायटी मतदारसंघात प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. बिगरशेती मतदारसंघात पाच जागांसाठी १४, महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी ९, अनुसूचित जाती मतदारसंघात ५, व्हीजेएनटी आणि ओबीसी मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत, असेही श्री. बारहाते यांनी सांगितले. 

'यांनी' घेतली माघार 
खासदार डॉ. कराड यांना वैजापूरचे दिनेश परदेशी यांच्यासाठी माघार घेण्याचे सांगितले. तर आमदार नितीन पाटील यांच्यासाठी बँकेचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांना माघार घ्यावी लागली. तसेच सिल्लोडमध्ये सत्तार यांच्यातर्फे काही दगा फटका होऊ नये यासाठी विरोधी गटातर्फे भाजपतर्फे किरणदेवी जैस्वाल आणि रामदास पालोदकर यांनी माघार घेतली. यासह अंबादास मानकापे यांनीही माघार घेतली. अर्ज माघे घेण्याच्या ठिकाणीही राज्यमंत्री सत्तार यांच्याकडून काही दगाफटका होऊ नयेत यासाठी भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT