contenment zones in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus| केंद्रीय पथक येताच लागले कंन्टेनमेंट झोनमध्ये फलक

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असलेले २६ भाग महापालिकेने कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. या भागात नागरिकांनी फिरू नये म्हणून, फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्याचा विसर प्रशासनाला पडला होता. दरम्यान शहरात गुरूवारी केंद्रीय पथक दाखल होताच हे फलक लावण्यात आले. पण प्रतिबंधित क्षेत्रात इतर भागातील नागरिकांचा वावर सुरूच आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरातील जास्त रुग्ण असलेल्या वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करा. त्याठिकाणी स्वतंत्र उपाययोजना करा, असे आदेश गेल्या महिन्यात केंद्रीय पथकाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने स्मार्ट सिटीच्या टीमकडे ही जबाबदारी सोपविली होती. या टीमने शहरात २६ कन्टेनमेंट झोन जाहीर केले होते. त्यात बिग हॉटस्पॉट म्हणून आठ, मध्यम कन्टेनमेंट झोन म्हणून १२ व मायक्रो झोनमध्ये सहा वसाहतींचा समावेश करण्यात आला आहे.

कन्टेनमेंट झोन निश्‍चित केल्यानंतर या भागात बॅनर्स व पोस्टर्स लावून हे भाग प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा संदेश इतर भागातील नागरिकांना दिला जाणार होता. पण कन्टेनमेंट झोन जाहीर करून तीन दिवस उलटूनही फलक लावण्यात आले नव्हते. गुरूवारी केंद्रीय पथक शहरात येताच महापालिकेने कन्टेनमेंट झोनमध्ये बॅनर्स लावले.

इतर भागातील नागरिकांना या भागात प्रवेश करण्यास मनाई असल्याची सूचना या बॅनर्सवर दिलेली आहे. आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधितांवर साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई किंवा गुन्हा दाखल केला जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. पण या आदेशाचे पालन अद्याप सुरू झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT