Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी घाटीत ‘एसओपी’ लवकरच! ५२८ पैकी ४५० खाटा भरल्या

मनोज साखरे

औरंगाबाद : ऑक्सिजन, आयसीयू खाटांची गरज असलेल्या कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बहुतांश रुग्णालये व कोविड सेंटरमधूनही घाटीत रुग्ण भरती केले जातात; परंतू या प्रक्रियेसाठी ‘एसओपी’ घाटी रुग्णालय प्रशासनाने तयार केली, जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुमतीनंतर ती लवकरच अमंलात येईल, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी दिली.


जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज (ता. १६) घाटी रुग्णालयाचा आढावा घेतला. बेड वाढविण्याची सूचना त्यांनी घाटी प्रशासनाला केली. तसेच नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराबाबत त्यांनी सुचना केल्याची माहितीही डॉ. वर्षा रोटे यांनी दिली. कोविड केअर सेंटर व इतर ठिकाणी रुग्णांवर उपचार होतात. तेथे त्यांच्या प्रकृतीबाबत समस्या उद्भवल्यास पुढील प्रक्रीयेबाबत एक एसओपी तयार करण्यात आली आहे. ती एसओपी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोविड केअर सेंटर व कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या आरोग्य संस्थांना देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.


विद्यार्थ्यांना करावी लागतेय वेटींग
घाटी रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने वसतीगृहात राहतात. या वसतीगृहातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स कोरोनाबाधित आढळत आहेत. परंतू त्यांना खाटासाठी वेटींग करावी लागत आहे. रुग्णाला सुटी झाल्यानंतर त्यांना खाटा मिळत असून १२ ते १६ तास वेटींग करावी लागत आहे. याबाबत डॉ. रोटे यांनी त्यांच्या नियोजनाबाबत उपाय योजनाही केल्याचे सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT