Aurangabad District Bank News 
छत्रपती संभाजीनगर

हरिभाऊ बागडे म्हणतात, बँक उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा बँक आणि लातूर येथील बँकच नफ्यात आहेत. पारदर्शक पद्धतीने कारभार केल्यामुळे बँक चागल्या स्थितीत आहे. सहकार क्षेत्र टिकविण्यासाठी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवत आम्ही काम करीत आहोत. सहकार क्षेत्र उद्धवस्त होऊ नये, बँक वाचविण्यासाठीच आम्ही सर्वपक्षीय संचालक कार्यरत असल्याचे आमदार तथा माजी विधानपरिषदेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (ता.११) पत्रकार परिषदेत सांगितले.


आमदार हरिभाऊ बागडे, कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शेतकरी विकास पॅनलची स्थापना करण्यात आली. उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली. दरम्यान, बुधवारी (ता.दहा) माजी आमदारांचे सर्वपक्षीय पॅनल जाहीर करण्यात आले. त्यावेळी आमदार, राज्यमंत्र्यांऐवजी सर्वसामन्यांना संधी द्यावीत असा आरोप विरोधकांतर्फे करण्यात आला होता. त्यावर हरिभाऊ बागडे म्हणाले, की आम्ही ४० वर्षांपासून काम करीत आहोत. आरोप करणाऱ्यांनी किती व कोणत्या संस्था काढल्या त्याचे उत्तर द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला.

बँकेचा पारदर्शक कारभार यापुढेही चालत राहावा यासाठी आम्ही शेतकरी विकास पॅनल ची स्थापना केली असून त्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत. यात आम्हालाच यश येईल. शेतकरी विकास पॅनेलकडून पुन्हा माजी आमदार नितीन पाटील यांना चेअरमन करण्याची अनेकांची इच्छा असल्याचेही बागडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस आमदार अंबादास दानवे, नितीन पाटील, अभिजित देशमुख, अण्णासाहेब माने, अंकुश रंधे,दमोदर नवपूते उपस्थित होते.

मित्रपक्ष चर्चेला आले नाही
बँक ही पवित्र मंदिराप्रमाणे आहे. यामुळे येथे जात-पात न पहाता आम्हाला पॅनल बनवायचे होते. यासाठी आम्ही मित्र पक्षाला चर्चेसाठी बोलवले होते. मात्र कोणीच आले नाहीत. यामुळे जे सोबत आले त्यांनी घेऊन पॅनल जाहिर करावे लागले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT