Aurangabad now Go home and get vaccinate sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद मध्ये आता घरी जाऊन लस!

शहरात तब्बल ७० हजार जणांसाठी मोहीम, दुसरा डोस टाळणाऱ्यांना शोधणार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना आता घरोघरी जाऊन डोस दिला जाणार आहे. मंगळवारी (ता. २८) प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी हर्सूल भागात जाऊन घरोघरी भेट देत नागरिकांना लस न घेण्याचे कारण विचारत लसीकरण (Vaccination) करून घेतले. महापालिकेच्या वॉर रुममधून वारंवार फोन करून या नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. पण त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांच्या घरी जाऊन लस देण्याचा निर्णय महापालिका (Aurangabad Municipal Corporation) प्रशासनाने घेतला आहे. सुमारे ७० हजार नागरिक प्रशासनाच्या ‘टार्गेट’वर आहेत.

सध्या लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. तसेच लस नाही तर प्रवास नाही, लस नाही तर प्रवेश नाही, असा निर्णय घेत नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केली जात आहे. असे असले तरी अनेक जण लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहे.

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवस आहे तर कोवॅक्सिन लसीमधील अंतर २८ दिवस आहे. हे दिवस संपल्यानंतरही सुमारे ७० हजार जणांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे अशा नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वॉर रुममधून फोन करून लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.

मात्र त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन अशा नागरिकांना लस दिली जाणार आहे. मंगळवारी हर्सूल भागातील घरांना भेटी देऊन प्रशासकांनी नागरिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर याठिकाणी लसीकरण करण्यात आले, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

८१ टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस

महापालिकेला कोरोना लसीकरणाचे ११ लाख ७६ हजार ९९९ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आत्तापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी ८१.९६ एवढी आहे. पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी ८१.४२ तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी ४७.२० असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT