Aurangabad Omicron Positive I want vacation I mean sakal
छत्रपती संभाजीनगर

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह | मला सुटी पाहिजे, म्हणजे पाहिजेच...

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह तरुणाचा प्रशासनावर दबाव

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दुबईवरून शहरात आलेल्या तरुणाला ओमिक्रॉन विषाणूची (Omicron virus) बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याच्यावर सध्या महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. १४ दिवसानंतर बाधिताला घरी सोडण्यात यावे, अशी नियमावली असताना हा तरुण मला कुठलाही त्रास नाही, त्यामुळे सुटी पाहिजे, म्हणजे पाहिजेच, असा हट्ट धरून बसला आहे. त्यामुळे महापालिका (Aurangabad Municipal Corporation) प्रशासन पेचात सापडले आहे.

शहरात ओमिक्रॉनची दोघांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी (ता. २५) या दोघांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील एकजण औरंगाबादमधील मुळ रहिवासी व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या कुटुंबातील आहे. त्यांची मुलगी मुंबईतच पॉझिटिव्ह आली होती तर वडील औरंगाबादला आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुसरा रुग्ण सिडको एन-७ येथील रहिवासी आहे. तो दुबईहुन शहरात १७ डिसेंबरला शहरात आला.

त्याचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज त्याचा दहावा दिवस होता. पण गेल्या दोन दिवसांपासून तो सुटीसाठी प्रशासनावर दबाव आणत आहे. कुठलेही तीव्र लक्षणे नसताना, हॉस्पिटलमध्ये ठेवताच कशाला? मी घरी विलगीकरणात राहतो, असे सांगून त्याने डॉक्टरांना भंडावून सोडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT