पैठण : स्वातंत्र्य सैनिक पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला राज्य शासनाकडून मिळणारे निवृत्ती वेतन तब्बल १३ वर्षांपासून न मिळाल्याने आनंदपूर (ता. पैठण) येथील स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचे हाल सुरु असून हाच का स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव असा सवाल उपस्थित झाला आहे.
मुक्ताबाई अप्पा निवारे (वय ८०) असे निवृत्ती वेतनासाठी सरकार दरबारी चकरा मारणाऱ्या महिलेचे नाव असून तालुक्याचे आमदार तथा रोहयो मंत्री त्यांच्या समस्येचे दखल घेणार का असा सवाल तालुक्यातील सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत जिल्हाधिकारी यांनी निवृत्ती वेतन ज्या महाराष्ट्र बॅंकेच्या पैठण शाखेतून स्वातंत्र्य सैनिकाला वेतन मिळत होते. त्या बॅंकेच्या व्यवस्थापकाला दोन वेळा लेखी पत्र देऊनही बॅंकेने मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला अक्षरशः केराची टोपली दाखविली आहे.
मुक्ताबाई निवारे यांनी वारंवार महाराष्ट्र बॅकेत संपर्क साधून व प्रत्यक्षात भेटूनही बॅंकेच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकारी यांच्या लेखी पत्राची गंभीर दखल न घेता दुर्लक्ष केल्यामुळे स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी हताश झाल्या आहे. पतीच्या निधनानंतर लगेच त्यांना निवृत्ती वेतन मिळायला पाहिजे होते. परंतु वेतन न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घातले व स्वातंत्र्य सैनिकाला वेतन मिळत असलेल्या महाराष्ट्र बॅंकेच्या व्यवस्थापकाला २१ फेब्रुवारी २०२१ रोजी लेखी पत्र दिले. त्यात २ मार्च २००९ रोजी स्वातंत्र्य सैनिकाचे निधन झाल्यानंतर आजपर्यंत निवृत्ती वेतन मिळाले नसल्याचे नमुद करून याप्रकरणी स्पष्ट खुलासा करण्याचे कळविले.
परंतु बॅंकेने मात्र, याबाबत काहीच कार्यवाही न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला बेदखल केले. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली व निवृत्ती वेतन मिळत नसल्याचे बाब निदर्शनास आणून दिली असता जिल्हाधिकारी यांनी पुन्हा २५ जुलै २०२२ रोजी स्मरण पत्र दिले. परंतु पुन्हा बॅंकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या या स्मरण पत्राला हरताळ फासून आपल्या मनमानीचे दर्शन घडविले. बॅंकेच्या या दुर्लक्षितपणामुळे स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची फरफट होत आहे.
आत्मदहनाचा इशारा देताच मुक्ताबाईंच्या हस्ते फडकविला झेंडा!
निवृत्ती वेतनाची मागणी करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या १५ ऑग्स्ट रोजी पैठण येथे तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मुक्ताबाई निवारे यांनी दिला. यानंतर तहसील प्रशासनाने त्यांची भेट घेऊन व उपरोक्त मागणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्याचे आश्वासन दिले. तसेच तहसील प्रशासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा तिरंगा झेंडा पैठण येथे तहसील कार्यालयात मुक्ताबाईंच्या हस्ते फडकविला. हा सन्मान जरी शासनाने दिला असला तरी हा सन्मान जेव्हा निवृत्ती वेतन मिळेल तेव्हाच खरा सन्मान ठरेल. अशी भावना मुक्ताबाई निवारे यांनी तहसील प्रशासन समोर व्यक्त केली. मात्र, नंतर तहसीलप्रशासनालाही या आश्वासनाचा विसर पडल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.