Aurangabad Panthers Republican Party gathering 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही; अमोल मिटकरी

पँथर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मेळावा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - संविधानाची पायमल्ली सातत्याने राज्याचे राज्यपाल, देशातील अनेक नेत्यांकडून होत आहे. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतींच्या नावासमोर आदिवासी समाजाच्या असा उल्लेख म्हणजे जातीयवाद आजही कायम असल्याचे लक्षण आहे. भाजप सरकारने देशाचे सर्वोच्च प्रतीक असलेले अशोक स्तंभ बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला. महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापन होण्यासही संवैधानिक अडचण आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. लवकरच महाराष्ट्रात सत्ताबदल दिसेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.

पँथर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर ठराव दिनानिमित्त तापडिया नाट्यमंदिरात मेळावा व व्याख्यान झाले. व्यासपीठावर पँथरच्या राष्ट्रीय अध्यक्षा सूर्यकांता गाडे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रा. सिद्धांत गाडे, आमदार नीलेश लंके, मिलिंद पाटील, प्रतिभा अहिरे, प्रकाश निकाळजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अमोल मिटकरी म्हणाले, की राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली, त्याआधी मंत्रोच्चार होतात, त्यांच्या नावापुढे आदिवासी समाजाच्या असा उल्लेख केल्या जातो, राज्याचे नूतन मुख्यमंत्रीही दालनात जाण्यापूर्वी पूजा विधी करतात, हे प्रकार संविधानाची पायमल्ली करणारे आहे.

विदर्भ, मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांवर फार मोठे संकट आहे. गुवाहटी-गोव्याला जायला, जेवणावळ्या झोडायला, स्पेशल चॉपर द्यायला या सरकारकडे पैसा आहे, पण शेतकऱ्यांना भरीव मदत अजूनही दिली नाही. राज्यातील शेतकरी यांच्या घरावर रुमणं मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी आमदार नीलेश लंके यांनीही आपले विचार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT